डोंबिवली : डोंबिवलीतील (Dombivali) दत्तनगर परिसरात (Dattanagar Area) एका घरातून दागिने आणि रोकड असे 70 हजाराची चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला डोंबिवली तील रामनगर पोलिसांनी (Ramnagar Police) अटक केली आहे. किशन कालरे असे या चोरट्याचे नाव असून त्याने आतापर्यंत किती घरफोड्या केल्या आहेत, याचा तपास पोलीस करीत आहेत. किशन हा डोंबिवली पूर्वेतील संगीतावाडी परिसरात राहतो. रामनगर पोलिसांनी सीसीटीव्हीचा साह्याने या गुन्हाच छडा लावला आहे.
आतापर्यंत डोंबिवली भागात अनेक घरफोड्या झाल्या आहेत. त्याचबरोबर पोलिस मागच्या कित्येक दिवसांपासून चोरट्याच्या शोधात होते. पोलिसांनी चोरी झाल्यानंतर सीसीटिव्ही तपासणी केली, त्यामध्ये एक चेहरा दिसला. तो परिसरातील असल्यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ताब्यात घेतलेल्या किशन कालरे याच्यासोबत आणखी कितीजण सोबत आहेत, त्याचबरोबर यांची टोळी आहे का ? आतापर्यंत किती घरफोड्या केल्या आहेत याची चौकशी डोंबिवली पोलिस करणार असल्याची माहिती समजली आहे.