नवजात अर्भकाला आईने बाथरूमच्या खिडकीतून फेकले, कारण समजताचं पोलिसांनी….
त्याचा जन्म झाला, पण डोळे उघडण्यापुर्वीचं आईने केलं असं काही की...
नवी दिल्ली : दिल्लीत (Delhi) एक भयानक घटना उघडकीस आली आहे, त्यामुळे संपुर्ण दिल्ली हादरली आहे. त्याचबरोबर पोलिस (Delhi police) सुध्दा तपासात गुंतले आहेत. दिल्लीत न्यू अशोक विहार परिसरात सोमवारी रस्त्यावर एका जन्मलेल्या मुलाचं अर्भक तिथल्या स्थानिक नागरिकांना सापडलं. त्यावेळी अर्भक तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी (Delhi Doctor) त्याला मृत घोषित केलं.
ज्यावेळी पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी ते जन्मलेलं मुलं तिथल्या तरुणीने फेकल्याचं स्पष्ट झालं. त्या संबंधित तरुणीचं वय वीस वर्षे आहे. ती तरुणी अविवाहीत आहे. त्याचबरोबर बदनामी होऊ नये, या भीतीपोटी तिने हे कृत्य केल्याचं पोलिस चौकशीत मान्य केलं.
पोलिसांनी जाहीर केलेली माहिती, ती मुलगी नोएडातील निजी कंपनीत काम करीत आहे. तसेच जय अम्बे अपार्टमेंट राहत आहे. मुल जन्माला आल्यानंतर घाबरलेल्या तरुणीने ते रस्त्यावर फेकून दिले.
पोलिसांनी संबंधित तरुणीवरती गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरु आहे. ते मुलाचा बाप कोण याची सुध्दा चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.