कल्याण : कल्याण डोंबिवलीत गेल्या काही दिवसांपासून चोरी (Theft)चे प्रमाण वाढले आहे. एकदा वस्तू चोरीला गेली की, ती परत मिळणे तसं मुश्किल असतं. कल्याण परिमंडळ झोन 3 मध्ये विविध प्रकारच्या चोरीचे एकूण 80 गुन्हे दाखल झाले होते. एकूण आठ पोलीस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यातील एकूण 1 कोटी 50 लाख 99 हजार 41 रुपयांचा चोरलेला मुद्देमाल (Stolen Goods) आज नागरिकांना परत (Return) करण्यात आला आहे. कल्याण पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. दरम्यान, या गुन्ह्याची संख्य पाहता कल्याणमध्ये चोरीचे प्रमाण अधिक असले तरी जबरी चोरीचे प्रमाण डोंबिवलीमध्ये अधिक असल्याचे दिसून येत आहे. मात्र गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनीही कंबर कसली आहे.
कल्याण डोंबिवलीत परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडा, वाहन चोरीचे घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे. कल्याण झोन 3 अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, कल्याण डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील आणि सुनील कुऱ्हाडे यांनी विशेष टीम बनवत सर्व पोलीस स्थानकाला लवकरात लवकर गुन्हे उघडकीस आणण्यास आदेश दिले. त्यानुसार कल्याण परिमंडळ झोन 3 अंतर्गत असलेल्या आठ पोलीस ठाण्यातील एकूण 80 गुन्हाचे उकल करण्यास पोलिसांना यश मिळाले आहे. आठ पोलीस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यातील एकूण 1 कोटी 50 लाख 99 हजार 41 रुपयांचा चोरलेला मुद्देमाल जप्त करत आज नागरिकांना परत करण्यात आलाय. हा कार्यक्रम अप्पर पोलीस आयुक्त कल्याण विभाग दत्तात्रय शिंदे यांच्या विशेष उपस्थितीत कल्याण पश्चिमेकडील वायले नगर येथील साई हॉल येथे हा संपन्न झाला.
कल्याण डोंबिवली परिसरात एकूण चोरी – 38
जबरी चोरी – 11
घरफोडी – 9
दरोडा – 1
फसवणूक – 5
मिसिंग – 13
एकूण – 80 गुन्हे दाखल (The Kalyan police returned the stolen goods worth one and a half crores to the citizens)