विदेशात नोकरीची अपेक्षा, त्यानं बरोबर हेरलं आणि वेळोवेळी…धक्कादायक प्रकरण आता पोलीस ठाण्यात पोहचलं…
विदेशात नोकरीला लावून देतो असे सांगत फसवणुक केल्याचा प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. यामध्ये लाखों रुपयांना तरुणींला एका तरुणाने गंडा घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
नाशिक : फसवणूक करण्यासाठी भामटे नवनवीन शक्कल लढवत असतात. विशेष म्हणजे फसवणुकीच्या विविध घटना ( Fraud Case ) समोर येत असतांना अनेक नागरिक फसवणुकीच्या ( Nashik Crime News ) जाळ्यात अडकतात. असाच एक प्रकार नाशिकमध्ये ( Nashik News ) उघडकीस आला आहे. फसवणूक झालेल्या तरुणीने उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनेनंतर नाशिक शहरात तरुण-तरुणींना फसवणुकीच्या जाळ्यात ओढणारी टोळी सक्रिय असल्याचे समोर आले आहे.
विदेशात तुमच्या शिक्षणाला साजेशी नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून एका तरुणीची जवळपास पाच लाख साठ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यावरून तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे.
तरुणीने एका तरुणाच्या विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून उपनगर पोलीसांनी गुन्हा दाखल करून घेत गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. सिडको येथील स्वप्नील पानपाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विदेशात आपल्या शिक्षणानुसार मी नोकरी लावून देतो अनेक तरुण तरुणींचा विश्वास संपादन करत फसवणूक करणारी टोळी आजही नाशिक शहरात कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार पोलीसांनी तपास सुरू केला आहे.\
उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोखंडे मळा येथील गोसावी नामक तरुणीने पोलिसांत ही तक्रार दिली आहे. त्यामध्ये 5 लाख 60 हजार रुपयांची ही फसवणूक झाली आहे. युवतीने चेकद्वारे हे पैसे दिले आहे.
खरंतर तरुणीची आणि तरुणाची अनेक वर्षांपासून ओळख आहे. त्यामध्ये तरुणीने अनेकदा विदेशातील नोकरीबाबत विचारणा करूनही काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. उडवाउडवीचे उत्तरे दिली जात होती. तेव्हाच तरुणीला मोठा धक्का बसला होता.
तरुणीकडून पैशाची मागणी केली तरुणाने त्यामध्ये नकार दिला. त्यानंतर तरुणीने ही बाब तिच्या कुटुंबाला सांगितली. त्यानंतर गोसावी कुटुंबाने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यावरून उपनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांच्या तपासात आता काय समोर येईल हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
खरंतर नोकरीला लावून देतो म्हणून अनेक ठिकाणी फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अनेकांना शिक्षा झाली आहे. अनेकांना लाखों रुपयांना गंडा घातला गेला आहे. त्यामुळे नोकरीला लावून देतो म्हणून असे आमिष कोणी दाखवत असेल तर त्यापासून दूर राहण्याचा सल्लाही अनेकदा पोलीसांनी दिला आहे.