पतीने विरोध केला तरीही प्रियकराला भेटायला जायची दोन मुलांची आई, शेवटी ओयो हॉटेलमध्ये या अवस्थेत सापडली
तिच्यात आणि त्याच्यात दहा वर्षांचे अंतर होते. ती दोन मुलांची आई होती. त्याचे लग्न ठरले आणि तिने या लग्नाला कडाडून विरोध केला अखेर त्याने लग्नाला विरोध करणाऱ्या आपल्या विवाहित प्रेयसीलाच संपवले.
नवी दिल्ली : एका नातलगाच्या लग्नात त्यांची ओळख झाली. ती दोन मुलांची आई होती. एका कपड्याच्या फॅक्टरीत काम करणाऱ्या सोनू याने अनिताला आणि तिच्या नवऱ्याला कपड्याच्या फॅक्टरीत नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले आणि त्यांनी उत्तर प्रदेशातील इटावा येथील गाव सोडले आणि ते नोयडात फॅक्टरी शेजारी भाड्याने राहू लागले. सोनू याने कामाला लावल्याने अनिताचे आणि सोनूचे प्रेमसंबंध जुळले आणि या अनैतिक नात्याची परिणीती अखेर तिच्या शेवटाने झाली.
विवाहीत महिला अनिता हीला अठरा आणि तेरा वर्षांची दोन मुले आहेत. आरोपी सोनू हा उत्तर प्रदेशातील इटावा गावचा रहीवासी आहे. तीन वर्षांपूर्वी एका लग्न समारंभात राजेंद्र आणि अनिता या पती – पत्नीची सोनू याच्याशी ओळख झाली. त्यानंतर दोघामध्ये बातचीत वाढू लागली. सोनू याने राजेंद्र बाबू याला नोकरी देण्यासाठी नोयडाच्या छीजारसी गावी येण्याचे आमंत्रण दिले. त्यानंतर राजेंद्र आपल्या कुटुंबासह तेथे शिफ्ट झाला. त्यानंतर राजेंद्रला सोनूने तो जेथे शिलाईचे काम करतो त्याच कंपनीत हेल्परची नोकरी ओळखीने लावली. त्यानंतर सोनू आणि अनिता यांचे रोजचे भेटणे सुरू झाले.
लग्नावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण
सुमारे दोन वर्षे सोनू आणि अनिता यांचे संबंध राहीले. सोनू अनिता पेक्षा दहा वर्षांनी लहान होता. त्याचा विवाह तीन मे रोजी ठरला होता. त्यावरून अनिता आणि त्याच्यात भांडण झाले. दोघे शुक्रवारी ओयो हॉटेलात भेटले. तेथे लग्नावरून पुन्हा त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. अनिताला तो लग्न करीत असल्याने खूप राग आला आणि तिने त्याच्या लग्नाला जोरदार विरोध केला. त्यामुळे चिडलेल्या सोनूने धागा कापण्याच्या कटरने तिच्या डोके आणि चेहऱ्यासह शरीरावर गंभीर वार केले आणि पळून गेला.
सोनू अनिताच्या दूरच्या नात्यातला होता
संघ्याकाळ झाली तरी सोनू आणि अनिता रूमच्या बाहेर आले नाहीत हे पाहून हॉटेलचा कर्मचारी आत गेला तर बाथरूममध्ये अनिताचा मृतदेह निपचित पडला होता. सोनू अनिताचा दूरचा नातलग होता. सोनू तिला तिच्या घरीही भेटायला जात होता. पतीने विरोध केल्यानंतर दोघे हॉटेलात जाऊन भेटू लागले. पोलिसांच्या तपासात ही महिला दोन गरोदर देखील राहीली होती. परंतू सोनूचे लग्न ठरले तसे तो अनिताला भेटायचे टाळू लागला. यातून दोघांमध्ये भांडण झाल्याचे एसीपी अमित प्रताप सिंह यांनी सांगितले.