बाफना खून प्रकरणात मोठी अपडेट! व्हिडिओ ठरला महत्वाचा पुरावा, दोघांना दोषी ठरवलं पण…
विपीन बाफणा याचा खून केल्यानंतर संशयित आरोपींनी व्हिडिओ केला होता, त्यात दोन आरोपी दिसून आले आहेत, त्यामुळे खुणासाठी हा सबळ पुरावा ठरला आहे.
नाशिक : जून 2013 मध्ये महाविद्यालयीन तरुणाचे अपहरण आणि खंडणी न दिल्याने केलेल्या हत्येने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली होती. धान्य व्यापारी गुलाबचंद बाफना यांचा मुलगा विपीन बाफणा याची त्यावेळी हत्या झाली होती. विपीन हा नाशिकमधील एका नामांकित महाविद्यालायत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. आरोपीने खंडणीसाठी विपीन याचे अपहरण केले होते, त्यानंतर कुटुंबाकडे खंडणी मागितली होती, त्यात बाफणा यांनी पोलीस ठाण्यात अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र दुसऱ्याच दिवशी विपिन याचा आडगाव शिवारात मृतदेह आढळून आला होता. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. तब्बल नऊ वर्षांनी या खुनाच्या प्रकरणात संशयित आरोपींपैकी दोघांना दोषी ठरविले असून तिघांची पुराव्या अभाव्या निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
बाफणा खून प्रकरणात 35 साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले होते, इतकंच काय तर संशयित पाच आरोपींना नाशिकच्या कारागृहात ठेवण्यात आलेले होते.
विपीन बाफणा याचा खून केल्यानंतर संशयित आरोपींनी व्हिडिओ केला होता, त्यात दोन आरोपी दिसून आले आहेत, त्यामुळे खुणासाठी हा सबळ पुरावा ठरला आहे.
विपीन बाफणा याच्या खुनाच्या संदर्भात दोषारोप सादर करत असतांना व्हिडिओ, मोबाइल आणि सीम कार्ड याशिवाय इतर तांत्रिक बाबींचा समावेश करण्यात आला होता.
न्यायमूर्ती अदिती कदम यांच्या कोर्टात सुनावली झाली असून त्यामध्ये चेतन पगारे आणि अमन जट या दोघांना दोषी ठरविले असून इतर तिघांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
शिक्षेची सुनावणी गुरुवारी होणार असून त्यामध्ये फाशीची शिक्षा किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते याकडे लक्ष लागून आहे, याशिवाय या सुनावणी दरम्यान कोर्ट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.