धक्कादायक! चार अल्पवयीन मुलांसह एकानं रचला होता मोठा डाव, एटीएम फोडण्यासाठी कशाचा वापर ?
मालेगाव शहरातील सटाणा नाका परिसरातील एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच संशयितांना मालेगाव पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
नाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढतच चालला आहे. नाशिकच्या ग्रामीण भागातील गुन्हेगारीमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग दिसून येत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या मालेगावमध्ये मागील आठवड्यात एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता. एटीएम फोडत असतांनाच पोलीस गस्तीवर असल्याने सायरन वाजल्याने चोरटे पसार झाले होते. याच संदर्भात सिसिटीव्हीच्या आधारे मालेगाव पोलीसांनी पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे पाच संशयित आरोपींपैकी चार अल्पवयीन आहे. एटीएम फोडण्याच्या प्लॅन आखलेला संशयित हा सुद्धा 19 वर्षांचा आहे. हुमैर आबीद शेख असं त्याचे नाव उसून उर्वरित चौघे अल्पवयीन आहे. विशेष म्हणजे या संशयित तरुणांनी यू-ट्यूबवरील व्हिडिओ पाहून दोन दिवस एटीएम फोडीचा सराव केला होता अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.
मालेगाव शहरातील सटाणा नाका परिसरातील एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच संशयितांना मालेगाव पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
विशेष म्हणजे ताब्यात घेतलेल्या पाच संशयितांपैकी चौघे अल्पवयीन आहेत, त्यात अनेकही एक धक्कादायक बाब म्हणजे दोन दिवस एटीएम फोडीचा सराव यू-ट्यूबवर व्हिडिओ पाहून केला आहे.
या संपूर्ण एटीएम फोडीचा मास्टर माइंड हा 19 वर्षीय हुमैर आबीद शेख असून त्याला मालेगाव पोलीसांनी अटक केली होती त्यात त्याला 4 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मालेगाव शहरातील शनिवारी पहाटे अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता, त्यात चोरटे पोलिसांची गाडी दिसल्याने पसार झाले होते.
ग्रामीण भागातील विशेषतः मालेगाव मधील गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांचा सहभाग दिसून येत असल्याने चिंता व्यक्त केली जात असून पोलीसांनी कठोर पाऊले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.