Crime : ‘धूम’ चित्रपटापेक्षा खतरनाक! ठाण्यामध्ये चोरांनी लढवली अनोखी शक्कल, पण एका चुकीने सर्व फिस्कटलं

चोरी करण्यासाठी चोर काय काय युक्ती करतील याचा काही नेम नाही. ठाण्यातील कळवा परिसरात चोरी करण्यासाठी चोरांनी काय शक्कल लढवली ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घ्या.

Crime : 'धूम' चित्रपटापेक्षा खतरनाक! ठाण्यामध्ये चोरांनी लढवली अनोखी शक्कल, पण एका चुकीने सर्व फिस्कटलं
Follow us
| Updated on: Aug 31, 2024 | 11:42 PM

चोरी करण्यासाठी चोर काय काय युक्ती करतील याचा काही नेम नाही. ठाण्यातील कळवा परिसरात चोरी करण्यासाठी चक्क बेडूकउड्यांचा वापर करत चोरी करणाऱ्या चोरांच्या मुसक्या कळवा पोलिसांनी आवळल्या आहेत. सीसीटीव्ही मध्ये आपण दिसू नये यासाठी बेडूकऊड्या मारून चोरी करत असल्याची कबुली या अट्टल चोरांनी पोलिसांकडे दिली आहे. ठाण्यामधील कळवा परिसरातील ही घटना आहे.

24 ऑगस्ट रोजी कळवा पारसिक नगर परिसरात एका मेडिकलमध्ये चोरी झाल्याची घटना घडली होती. फिर्यादीने तक्रार केल्यानंतर कळवा पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला. सुरुवातीला याच परिसरात संशयायित पद्धतीने फिरत असलेल्या क्रिश लोटावानी या 19 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले.

क्रिश याच्याकडे पोलिसांनी आपल्या पद्धतीने चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली देत आपल्या इतर साथीदारांची देखील नावे सांगितली. मात्र या चोऱ्या ते कशा पद्धतीने करत होते याची माहिती जेव्हा या चोरांनी दिली तेव्हा पोलिसांना देखील आश्चर्य वाटले. सीसीटीव्हीमध्ये चेहरे कैद होऊ नये यासाठी चक्क बेडूकउड्या मारून हे सर्व चोरी करत असल्याचे या चोरांनी सांगितले.

या चोरांचे बेडूक उड्या मारून चोरी करताना सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांच्या हाती लागले आहेत. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून एक फररा आहे..या अट्टल चोरट्यांकडून एकूण आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. तर अधिक तपास कळवा पोलीस करत आहेत.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.