उद्योजक खून प्रकरण! आरोपींना शोधण्यासाठी पोलीसांनी आखला मास्टर प्लॅन…

पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तळ ठोकून विशेष पथके तयार करून मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशकडे रवाना केली आहे. तांत्रिक बाबींची मदत घेत खरात यांनी तपासाला वेग दिला आहे.

उद्योजक खून प्रकरण! आरोपींना शोधण्यासाठी पोलीसांनी आखला मास्टर प्लॅन...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Sep 14, 2022 | 5:53 PM

नाशिक : अनंत चतुर्दशीच्या दिवशी बेपत्ता झाल्यानंतर मालेगाव (Malegaon) येथे थेट मृतदेह आढळून आलेल्या शिरीष सोनवणे (Shirish Sonawane) यांच्या मारेकऱ्यांचा अद्यापही शोध लागलेला नाही. पाच दिवस उलटून गेल्याने नाशिक पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. दोन दिवसांपूर्वी मालेगाव येथून शिरीष सोनवणे यांच्या हत्येचा गुन्हा नाशिकरोड (NashikPolice) पोलीसांकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार पोलीस उपायुक्त विजय खरात (DCP) यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तळ ठोकून विशेष पथके तयार करून मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशकडे रवाना केली आहे. तांत्रिक बाबींची मदत घेत खरात यांनी तपासाला वेग दिला आहे. यासाठी एकूण सात पथकांची नेमणूक करत पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी मास्टर प्लॅन आखला आहे.

शिरीष सोनवणे यांचा मृतदेह नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याच्या हद्दीत सापडल्याने गुन्हा ग्रामीण पोलीसांकडे दाखल होता.

मात्र, कारखाना परिसरातून शिरीष सोनवणे यांचे अपहरण झालेले असल्याने गुन्हा नाशिक शहर पोलीसांच्या हद्दीत नाशिकरोड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

त्यानुसार मंगळवारी या गुन्ह्यासंदर्भात स्वतः परीमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विजय खरात नाशिकरोड पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते.

शिरीष सोनवणे खून प्रकरणातील आरोपी पाच दिवस झाले हाती लागत नसल्याने तांत्रिक बाबींवर खरात यांनी भर देत तपास सुरू केला आहे.

कारखान्यातील कामगारांना तपासासाठी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून याबाबत चौकशी केली जात असून पोलीस वेगवेगळ्या माध्यमातून तपास करत आहे.

शिरीष सोनवणे यांच्या खुणातील आरोपी हे तांत्रिक बाबींचा तपास करत असतांना उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशकडे गेल्याची माहिती पोलीसांच्या हाती लागलेली आहे.

शिरीष सोनवणे यांच्या खुनाच्या गुन्हाची उकल करण्यासाठी खरात यांच्या नेतृत्वाखाली एकूण सात पथके कार्यरत करण्यात आली आहे.

एका पथकाला दोघांचा सीटीव्हीच्या सहाय्याने सुगावा लागला असून परराज्यातील पोलिसांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

शिरीष सोनवणे हे फर्निचर उद्योजक होते. 9 सप्टेंबरला त्यांचे सिन्नर जवळ असलेल्या त्यांच्या कारखान्यातून अपहरण झाले होते, तर दुसऱ्या दिवशी मालेगाव येथे मृतदेह आढळून आला होता.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.