आधी दहशत निर्मान करून धिंगांना घातला, नंतर पोलीसांनी त्याच परिसरात गुंडांना घेऊन जात काय केल?
दुकानांची केलेली तोडफोड, एकावर प्राणघातक हल्ला, रात्रीच्या वेळेची आरडाओरड पाहून व्यावसायिकांनी पोलिसांना गुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.
नाशिक : गेल्या आठवड्यात नाशिक शहरातील अत्यंत वर्दळीचा असलेल्या परिसरात काही टोळक्यांनी दहशत निर्माण करत धिंगाणा घातला होता. जुन्या नाशिक परिसरातील असलेल्या दहीपूल परिसरातील दुकानांची तोडफोड करत दुकानदारांवर प्राणघातक हल्ला केला होता. त्यावरून बाजार पेठ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दोन गटात वाद होऊन एकावर प्राणघातक हल्ला झाल्याने या परिसरातील व्यावसायिक भीतीच्या सावटाखाली वावरत होते. त्यामुळे व्यावसायिकांकडून या दहशत माजवणाऱ्या गुंडाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलीसांनी संशयित गुंडांना चांगलाच दणका दिला आहे. मध्यवर्ती भागात दहशत निर्माण करणाऱ्या संशयितांच्या टोळक्याने ज्या-ज्या ठिकाणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या ठिकाणी नेऊन धिंड काढत बेदम चोप दिला आहे. रविवारी रात्रीच्या वेळी याच गुंडांनी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी दुकानांची तोडफोड करत एकावर जीवघेणा हल्ला केला होता.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील गुन्हेगारीने चांगलेच डोके वर काढले आहे. व्यापारी वर्गात दहशत निर्माण करण्यासाठी रविवारी रात्री काही गुंडांनी दुकानाची तोडफोड केली होती.
इतकंच काय दोन गटातील हाणामारी थेट एकावर जीवघेणा हल्ला करण्यापर्यंत गेली होती. त्यामुळे दहीपूल परिसरात घडलेली ही घटना व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारी ठरली होती.
दुकानांची केलेली तोडफोड, एकावर प्राणघातक हल्ला, रात्रीच्या वेळेची आरडाओरड पाहून व्यावसायिकांनी पोलिसांना गुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.
त्यावरून नाशिक शहर पोलीसांनी गुंडाच्या टोळीला बेदम चोप देऊन जिथे गुंडागर्दी केली तिथेच घेऊन जात धिंड काढली आहे, त्यामुळे या कारवाईचे नाशिककरांकडून स्वागत केले जात आहे.
याशिवाय नाशिक शहर पोलिसांच्या या कारवाईचे व्यावसायिकांनी सुद्धा स्वागत आहे, दरम्यान हल्ला केल्या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.