सरस्वती वैद्य हिच्या हत्येचे रहस्य अजूनही कायम, आरोपी मनोज साने याने केले नवे खुलासे

आज सरस्वती वैद्य यांच्या तीन बहिणी नयानगर पोलीस ठाण्यात आल्या होत्या. त्यातील मोठ्या बहिणीने सरस्वतीचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी मागितला. त्यांना सरस्वतीवर अंतिम संस्कार करायचे आहेत.

सरस्वती वैद्य हिच्या हत्येचे रहस्य अजूनही कायम, आरोपी मनोज साने याने केले नवे खुलासे
Follow us
| Updated on: Jun 09, 2023 | 7:25 PM

रमेश शर्मा, प्रतिनिधी, मुंबई : मीरा रोड येथील गीतानगरमध्ये आपल्या लिव्ह-इन पार्टनरची त्यांच्या फ्लॅटमध्ये हत्या केली. मृतदेहाचे असंख्य तुकडे केल्याचा आरोप आहे. आरोपी मनोज साने चौकशीदरम्यान पोलिसांना नव-नवे खुलासे करत आहे. मनोजला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडीमध्ये आहे. मनोज साने याने पोलिसांना सांगितलं की तिने आत्महत्या केली होती. त्यामुळे मी घाबरलो. लोक मला दोषी मानतील म्हणून मी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तुकडे तुकडे केलं. प्रेशर कुकरमध्ये शिजवलं. काही पार्ट्स बाहेरही फेकले होते. कुत्र्यालाही खायला टाकले होते. परंतु आरोपी मनोज सानेच्या या कहाणीवर पोलिसांना विश्वास नाही. हत्येचा सर्व बाजूने तपास करत आहेत.

मनोज साने गीतानगर गीत सोसायटीच्या बी विंगमध्ये चार वर्षे राहिला. त्यानंतर तीन वर्षे गीता अमरदीप इमारतीमध्ये कमरा नंबर 704 मध्ये राहायला गेला होता. सोसायटीची कोणाही व्यक्तीबरोबर तो संबंध ठेवत नव्हता. कारण वयाचं जास्त अंतर असल्याने तिला सरस्वती वैद्यवर विश्वास नव्हता. सूत्राने सांगितलं की त्याच्या नेहमीच सरस्वती वैद्य सोबत भांडण होत असे. कधी कधी तो कामावर असतानाही घरी तिला पाहण्यासाठी येत होता. घराचे दारही बंद करून जात होता.

हे सुद्धा वाचा

नवा खुलासा काय

सरस्वती वैद्य अनाथ आहे, अशी बातमी समोर आली होती. परंतु आज सरस्वती वैद्य यांच्या तीन बहिणी नयानगर पोलीस ठाण्यात आल्या होत्या. त्यातील मोठ्या बहिणीने सरस्वतीचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी मागितला. त्यांना सरस्वतीवर अंतिम संस्कार करायचे आहेत. डीसीपी जयंत बजबले यांनी डीएनए चाचणीनंतर बहिणींना सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे देण्यात येतील, अशी माहिती दिली.

कोण होती सरस्वती

सरस्वती ही मूळची छत्रपती संभाजीनगर येथील राहणारी आहे. आई लहानपणीच गेली. तर वडील सोडून गेले होते. सरस्वतीसह एकूण पाच बहिणी आहेत. सरस्वतीचे शिक्षण अहमदनगर येथील जानकीबाई आपटे बालिका अनाथ आश्रमात झालं. तेथे तिचं दहावीपर्यंत शिक्षण झाले. अठरा वर्षानंतर ती मुंबईला आपल्या नातेवाईकाकडे बोरिवली आली.

बोरिवलीमध्ये मनोज साने एका रेशनिंगच्या दुकानात काम करत होता. तेव्हा या दुकानात साहित्य खरेदीसाठी सरस्वती येत होती. तेथे तिची ओळख मनोज साने याच्याशी झाली. मनोजने तिला एका सेल्समनचा जॉबमध्ये लावले होते. मनोज साने याने तिला आपल्या घरी ठेवले.

मनोजला मामा असल्याचे सांगायची

मनोज सानेच्या प्रती सहानभूती असल्याने सरस्वती त्याच्यात प्रेमात पडली. सरस्वती आणि मनोज यांनी रजिस्टर लग्न केलं नाही. पण, एका मंदिरात लग्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. लग्नाची तारीख आरोपी मनोजला निट माहिती नाही. सरस्वती वैद्य आणि मनोज साने यांच्या वयात खूप अंतर आहे. सरस्वती आपल्या नातलगांना मनोज मामा असल्याचे सांगायची. कधी कधी जेव्हा आश्रम शाळेत मनोजसोबत जात होती तेव्हा ही मनोज साने मामा आहे. असं तिथे सांगत होती.

जवळपास 2017 साली मनोज साने सरस्वतीसोबत मिरा रोडच्या गीतानगर फेस 7 मध्ये राहायला आला. 4 वर्ष दोघे G wing गीता सुरुचीमध्ये राहिले. त्यानंतर त्याचं कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या गीता आकाशदीपमध्ये कमरा न. 704 मध्ये राहिले.

दोघांचीही व्हायची भांडण

दोघांच्या वयात अंतर असल्याने तो कधीही तिला घरातून बाहेर एकटा पाठवत नव्हता. कधी कधी घराचे कुलूप बंद करून कामावर जात होता. दोघांमध्ये नेहमीच भांडण होत होते, अशी सूत्रांकडून माहिती मिळाली. सरस्वतीच्या हत्तेचे रहस्य अजूनही कायम आहे. मनोजने हत्या करून मृतदेहाचे तुकडे तुकडे केलं की, सरस्वती वैद्य आत्महत्या केली. त्यानंतर आरोपीने मृतदेहाचे तुकडे तुकडे केले, असा नवा प्रश्न आता पोलिसांना पडला आहे.

Non Stop LIVE Update
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.