मनमाड, नाशिक : नाशिकच्या मनमाड येथे घडलेल्या एका गुन्ह्याची ग्रामीण भागात जोरदार चर्चा होऊ लागली आहे. त्याचे कारण म्हणजे विश्वास संपादन करण्यासाठी केलेला फंडा आणि त्यानंतर लांबविलेले दागिने. मनमाड येथील हनुमान नगर येथे राहणाऱ्या बेबी शिंदे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद नोंदवून घेतल्यानंतर घटना ऐकून पोलीसही चक्रावून गेले आहे. बेबी जाधव यांच्याकडून जुनी भांडी घेऊन जात नवी भांडी देणाऱ्या महिलेशी चांगली घट्ट मैत्री झाली होती. खरं म्हणजे वय वृद्ध आज्जीचे दागिने पळविण्याच्या उद्देशानेच संशयित महिलेने बेबी शिंदे या आज्जीशी मैत्री केली होती. त्यानंतर बरेच दिवशी आज्जीकडून जून भांडे घेऊन जात असत आणि नवीन भांडे आणून देत असत. असेच एक दिवस संशयित महिलेणे आज्जी तुमचे दागिने खून छान आहे. त्याची घडणही मला खूप आवडली आहे. मला माझे सर्व दागिने तुमच्या सारखे बनवायचे आहे त्यासाठी एक दिवस मला तुमचे दागिने सोनाराला दाखविण्यासाठी द्याल का म्हणून विनंती केली. त्यात आज्जीने विश्वासू असल्याचे पाहून दागिने दिले.
भांडी विक्री करणारया संशयित महिलेने आज्जीकडून सर्व दागिने घेतले आणि पोबारा केला, एक दिवस उलटून गेला भांडी विक्री करणारी बाई आली का नाही म्हणून चौकशी सुरू केली.
चौकशी करूनही संशयित महिलेचा शोध लागत नसल्याने आज्जीने आरडा ओरड सुरू केली, कुटुंबियांना माहीती दिली, त्यात आज्जीचे दागिने गोडबोलून पळविल्याचे लक्षात आले.
आज्जीला घेऊन कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि त्यानंतर संशयित महिलेवर गुन्हा दाखल केला आहे, यामध्ये जवळपास सव्वा दोन लाखाहून अधिक किमितीचे हे सोनं आहे.
यामध्ये आज्जीने साठवेलेल्या पुंजीतून सोनं केलं होतं त्यातच अशा प्रकारे विश्वास संपादन केल्यानं आज्जीला मोठा धक्का बसल्याने रडू कोसळत आहे. त्यामुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.