‘त्या’ तरुणाची आत्महत्या नव्हे हत्याच, शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासा

कामावर गेलेल्या तरुणाचा दुसऱ्या दिवशी झाडाला मृतदेह लटकलेला आढळला. आत्महत्या केल्याचा अहवालही ग्रामीण रुग्णालयाने दिला. मात्र कुटुंबीयांनी पुन्हा शवविच्छेदन केले असता धक्कदायक खुलासा झाला.

'त्या' तरुणाची आत्महत्या नव्हे हत्याच, शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासा
'त्या' तरुणाची आत्महत्या नव्हे हत्याचImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 11:35 AM

अहमदनगर : अज्ञात कारणातून एका ट्रॅक्टर चालक असलेल्या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना श्रीगोंदा तालुक्यात उघडकीस आली होती. या प्रकरणात आता धक्कदायक खुलासा झाला आहे. सुरुवातीला आत्महत्या वाटणाऱ्या या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. शवविच्छेदन अहवालात ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसात आता कलम 302 प्रमाणे अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला आहे. समाधान अंकुश मोरे असे 24 वर्षीय मयत तरुणाचे नाव आहे. तरुणाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

काय आहे प्रकरण?

श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोली येथे समाधान मोरे आपल्या कुटुंबासोबत राहत होता. समाधान मढेवडगाव येथे ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. ट्रॅक्टर मालक दिलीप मांडे यांनी 14 जुलै रोजी रात्री 9 वाजता घरी येऊन समाधानला कामावर नेले. यानंतर 15 जुलै रोजी मांडे यांनी समाधानच्या घरी फोन करुन त्याची तब्येत बिघडल्याचे सांगितले. यानंतर समाधानच्या भावाने मढेवडगावला जाऊन पाहिले असता समाधानटा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसला.

समाधानने आत्महत्या केल्याचे त्याच्या भावाला सांगण्यात आले. यानंतर श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात मृतेदहाचे शवविच्छेदन करत आत्महत्या केल्याचा दावा डॉक्टरांनी केला होता. मात्र समाधान आत्महत्या करु शकत नाही हे ठामपणे सांगत त्याच्या हत्येचा संशय व्यक्त करत मृतदेहाच्या दुसऱ्या रुग्णालयात शवविच्छेदन करण्याची मागणी करण्यात आली. पोलीस आणि डॉक्टर दोघेही आरोपींना मदत करत असल्याचा नातेवाईकांचा आरोप होता.

हे सुद्धा वाचा

कुटुंबीयांच्या मागणीनुसार पुण्यातील ससून रुग्णालयात समाधानच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर समाधानची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर चार दिवसांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधानची हत्या कुणी आणि कोणत्या कारणातून केली? याबाबत पोलीस सखोल चौकशी करत आहेत.

Non Stop LIVE Update
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही.
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला.
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत.
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?.
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?.
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका.
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप.
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला.
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?.
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक.