ग्रामीण भागात दरोडयाचे सत्र सुरूच, लागोपाठ पाच दरोडे पडल्यानं पोलिसांची डोकदुखी वाढली ?
नाशिकच्या ग्रामीण भागातील दरोडयाचे सत्र काही केल्या कमी व्हायला तयार नाहीये, महिनाभरात जवळपास पाच दरोडयाच्या घटना घडल्या आहेत. सिन्नर परिसरातच हे दरोडे पडण्यामागील कारणही चर्चेचा विषय ठरत आहे.
नाशिक : नाशिकच्या ग्रामीण भागात सशस्त्र दरोडा पडल्याने खळबळ उडाली आहे. महिनाभरात जवळपास ही पाचवी घटना असल्याने पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झाले आहे. सिन्नर परिसरात दरोडेखोरांनी लक्ष केल्यानं ग्रामीण पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. घरातील व्यक्तींना मारहाण करत दागिने आणि पैसे घेऊन पोबारा होणारी टोळी नाशिकच्या ग्रामीण पोलीसांच्या नाकावर तीचून आव्हान देत आहे. सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सहा जणांच्या टोळक्याने दरोडा टाकला आहे. या दरोडयात दागिने आणि लाखों रुपये घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला आहे. दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत घरातील सर्वांच्या तोंडाला टेप लावत बांधून ठेवले होते, त्यात महिलांनी दागिने देण्यास विरोध केल्याने दागिने ओरबाडले त्यामध्ये कानाला दुखापत झाली आहे. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
नाशिकच्या ग्रामीण भागातील दरोडयाचे सत्र काही केल्या कमी व्हायला तयार नाहीये, महिनाभरात जवळपास पाच दरोडयाच्या घटना घडल्या आहेत.
नाशिकच्या ग्रामीण भागातील सिन्नर परिसरातच हे दरोडे पडण्यामागील कारणही चर्चेचा विषय ठरत आहे.
इगतपुरी मार्गे सिन्नर परिसरातून समृद्धी महामार्ग गेला आहे, त्यामध्ये अनेक जणांची शेती गेली आहे, त्यात अनेकांनी बंगले, सोने खरेदी केली असून लाखों रुपये त्यांना मिळाले आहे.
त्यामुळे दरोडेखोर हे रेकी करून दरोडे टाकतात अशी चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे, अनेक ठिकाणी दरोडे पडत असतांना ग्रामीण पोलिसांना दरोडेखोरांना अटक करण्यात फारसे यश येतांना दिसून येत नाही.
मागील एका दरोडयाची उकल करण्यात पोलिसांना यश आले होते, त्यामधील काही आरोपींना पकडण्यात यश आले होते, मात्र त्यातील काही आरोपी फरारच होते.
दरोडेखोरांनी सिन्नर परिसरात लक्ष केल्याने रात्रीच्या वेळी नाशिक पोलीसांनी गस्त वाढवली आहे, सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली असून पोलीस दरोडेखोरांना पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहे.
ग्रामीण भागातील नागरिक या घटणेने भीतीच्या वातावरणात राहत असून पोलीसांनी दरोडेखोरांचा बंदोबस्त करावा अशी मगणी होऊ लागली आहे.
गुरुवारी सायंकाळी पडलेला दरोडा हा ज्ञानेश्वर कोंडाजी हुळहुळे यांच्या घरी पडला आहे, ते मार्केटमध्ये गेलेले असतांना मळ्यातील घरावर दरोडा पडला आहे. त्यात त्यांचा लाखों रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.