Ulhasnagar Slab Collapsed : उल्हासनगरात इमारतीच्या बाल्कनीचा स्लॅब कोसळला; सुदैवाने कुणीही जखमी नाही

उल्हासनगरच्या कॅम्प 4 मधील सेक्शन 28 मध्ये सी रॉक पॅलेस नावाची ही इमारत आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या बाल्कनीचा स्लॅब पहिल्या मजल्याच्या बाल्कनीवर कोसळला आहे. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झालेली नाही.

Ulhasnagar Slab Collapsed : उल्हासनगरात इमारतीच्या बाल्कनीचा स्लॅब कोसळला; सुदैवाने कुणीही जखमी नाही
संशयातून तरुणावर जीवघेणा हल्लाImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 1:42 AM

उल्हासनगर : पावसाळा सुरू होताच पडझडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही ठिकाणी इमारतीच्या दुर्घटना (Incident) घडत आहेत. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरातही बुधवारी एका इमारतीच्या बाल्कनीचा स्लॅब (Slab) कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सध्या केवळ स्लॅब कोसळला आहे, मात्र नजीकच्या काळात संपूर्ण इमारतीला धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिका प्रशासनाने खबरदारी घेत संबंधीत इमारत सील (Seal) केली आहे. महापालिकेकडून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून इमारत सील करण्यात आली आहे, अशी माहिती पालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. नागरिकांनाही या धोकादायक इमारतीच्या आसपास न फिरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

तळमजल्यावर आठ दुकाने होती सुरु

उल्हासनगरच्या कॅम्प 4 मधील सेक्शन 28 मध्ये सी रॉक पॅलेस नावाची ही इमारत आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या बाल्कनीचा स्लॅब पहिल्या मजल्याच्या बाल्कनीवर कोसळला आहे. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झालेली नाही. या इमारतीत एकूण 21 फ्लॅट असून त्यापैकी 18 फ्लॅट रिकामे होते. तर तळमजल्यावर 8 दुकानेसुद्धा चालू होती. या घटनेनंतर उल्हासनगर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने ही इमारत सील केली आहे.

दुर्घटनाग्रस्त इमारतीचा धोकादायक इमारतीच्या यादीत समावेश नाही

ज्या इमारतीचा स्लॅब कोसळला आहे, त्या इमारतीचा महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये समावेश नाही. नव्वदच्या दशकात या इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. या इमारतीला 30 वर्षे उलटून गेली आहे. मात्र ही इमारत धोकादायक इमारतींच्या यादीत नसल्याची माहिती उल्हासनगर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र काही दिवसांपूर्वी या इमारतीला स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर या इमारतीत स्लॅब कोसळण्याची घटना घडल्याने रहिवाशी आणि दुकानचालक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. महापालिका प्रशासनाने संभाव्य मोठी दुर्घटना टाळण्याच्या उद्देशाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून इमारत सील केली आहे.

हे सुद्धा वाचा

उल्हासनगर परिसरात अनेक धोकादायक आणि जीर्ण झालेल्या इमारती आहेत. अशा इमारतींमध्ये अजूनही रहिवाशी राहत आहेत. त्यांना वारंवार सावध करून ते धोक्याच्या घरातच वास्तव्य करून आहेत. पावसाळ्यात या इमारतींचा काही भाग कोसळतो. त्यात अनेकदा दुखापतीच्या घटना घडतात. या अनुषंगाने महापालिका प्रशासन आवश्यकतेनुसार धोकादायक इमारतींचा नव्याने आढावा घेऊन पावले उचलणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.(The slab of the balcony of the building collapsed in Ulhasnagar)

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.