नाशिक : लहान मुले चोरण्यासाठी आल्याचे समजून नाशिकमध्ये (Nashik) पुन्हा दोघांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. एका चारचाकी गाडीतून पैशांची बॅग घेऊन पळण्याच्या तयारीत असणाऱ्या दोघांना मुलं चोर असल्याचे समजून बेदम मारहाण करण्यात आली आहे, पोलिसांनी वेळेत पोहचून दोघांना वाचवले असून उपचारासाठी त्यांना जिल्हा रूग्णालयात (Civil Hospital) दाखल करण्यात आले आहे. नाशिकमध्ये मुलं चोरीच्या अफवा (Fake messaage) गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाले आहे त्यामुळे नागरिक प्रत्येकाला संशयाच्या नजरेत बघत आहे.
आज सकाळी गंजमाळ परिसरात एका चार चाकी गाडीचा नंबर प्लेटवर कलर टाकून गाडीमध्ये असलेले बॅग पळवण्याच्या तयारीत असताना वाहनचालकाच्या निदर्शनास आले होते.
नागरिकांनी चोर चोर असे आरडा ओरड केल्याने समोरच असलेल्या पंचशील नगर झोपडपट्टी कडे दोघेही पळाले.
परिसरातील नागरिकांनी चोर चोर ऐकून मुलं चोर असल्याचे समजून त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली.
पोलिसांनी वेळेत घटनास्थळी जाऊन दोघं संशयितांना लोकांच्या तावडीतून सोडून त्यांना उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
हे दोघे भाऊ असून ते मूळचे औरंगाबादचे रहिवासी आहेत. साहिल लक्ष्मीकुंठे आणि प्रभास लक्ष्मीकुंठे अशी त्यांची नावे आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजमुळे नागरिकांना प्रत्येकाकडे संशयाने बघण्याचा दृष्टीकोन दिसून येत आहे.
यापूर्वी नाशिकमध्ये सोशल मीडियावर मुले पळवणारी किंवा चोरणारी टोळी शहारात फिरत असल्याचा मेसेज व्हायरल झाला होता तेव्हा पोलीसांनी तो फेक असल्याची माहिती देखील दिली होती.
त्यादरम्यान टाकळीरोड परिसरात दोन ब्लँकेट विक्रेत्यांना मुले पळवणारी टोळी म्हणून बेदम मारहाण केली होती.
पालघर, सांगली येथे देखील मुले चोरणारी टोळी म्हणून साधू – महंतांना मारहाण झाल्याची घटना समोर आली होती.
धुळे येथे देखील भिक्षुक असलेल्या गोसावी समाजाच्या व्यक्तीला मुले पळवणारी टोळी असल्याचे समजून जीवे ठार मारले होते.
एकूणच मुले पळवणारी टोळी सक्रिय असल्याचा मेसेज फिरत असल्याने पोलिसांकडून अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन करण्याची वेळ वारंवार येते आहे.