‘गल्लीत येऊन दाखव’, मुलीचा 2 मुलांना चॅलेन्ज, मुलांचे मृतदेहच आले घरी
तरुणीने तिच्या अल्पवयीन भावाच्या मदतीने दोघांच्या हत्याकांडाचा कट रचल्याचे उघडकीस आले आहे. सोशल मिडीयातील वादातून घडलेल्या या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे.
नवी दिल्ली : सोशल मीडियावर रिल्स बनवणे जणू आजकालच्या तरुणांच्या लाईफस्टाईलचाच एक भाग बनला आहे. रिल्स बनवल्यानंतर लाईक्स आणि कमेंट्सवरुन सुरु असलेली स्पर्धा काही नवीन नाही. इन्स्टाग्रामवरील लाइक्स आणि कमेंट्सच्या (Like and Comments on Instagram) चढाओढीतून राजधानी नवी दिल्लीत घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने (Delhi Double Murder) सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. एका तरुणीने एका तरुणाला ‘गल्लीत येऊन दाखव’ असे चॅलेंज दिले. तरुणाने ते चॅलेंज (Challenge) स्विकारले. पण दुर्दैवाने त्याला आणि सोबत आलेल्या मित्राला प्राण गमवावा लागला.
भलस्वा डेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुकुंदपूर भाग दोन या परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. तरुणीने तिच्या अल्पवयीन भावाच्या मदतीने दोघांच्या हत्याकांडाचा कट रचल्याचे उघडकीस आले आहे. सोशल मिडीयातील वादातून घडलेल्या या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे.
चौघांना अटक; हत्याकांडातील शस्त्रे जप्त
या प्रकरणात पोलिसांनी आरोपी तरुणीसह इतर चौघांना अटक केली आहे. हत्याकांडासाठी वापरलेली शस्त्रेदेखील जप्त करण्यात आले आहे. या घटनेची भलस्वा डेरी पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सखोल चौकशी सुरू आहे.
विजयादशमीच्या उत्साहादरम्यान हत्याकांड
संपूर्ण देशभरासह राजधानी नवी दिल्लीमध्येही बुधवारी विजयादशमीचा प्रचंड उत्साह होता. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमानदरम्यान तरुणीने दुहेरी हत्याकांडाचा कट रचला होता.
विजयादशमीच्या कार्यक्रमातून परतणाऱ्या साहिल नावाच्या तरुणावर व त्याच्या मित्रावर चाकूने वार करण्यात आले आणि त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. लहान भावाच्या साथीने तरुणीने रचलेल्या या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने राजधानीमध्ये खळबळ उडाली आहे.
इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सची संख्या वाढवण्यावरून वाद
मुकुंदपूर भाग-2 या परिसरात राहणाऱ्या तरुणीचा साहिलबरोबर वाद झाला होता. इंस्टाग्रामवर फॉलोअर्सची संख्या वाढवणे हा क्षुल्लक मुद्दा दोघांमध्ये वादाचे कारण ठरला होता. तसेच सोशल मीडियातील पोस्टवर कमेंट करण्यावरूनही दोघांमध्ये मतभेद झाले होते.
याचे पर्यावसान दुहेरी हत्याकांडामध्ये झाल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत. शीतलने साहिलला तिच्या घरासमोरील गल्लीत येऊन दाखवण्याचे आव्हान दिले होते. ते आव्हान स्वीकारून साहिल हा त्याच्या मित्रासह शीतलच्या घराच्या आवारातील गल्लीतून चालला होता. याचदरम्यान शीतलने लहान भावाच्या मदतीने दुहेरी हत्याकांडाचा कट यशस्वी केला.