Terrible Crime: महिलांना दाखवत होता प्रायव्हेट पार्ट, गावकऱ्यांनी अंडरवेअरवरमध्ये पेट्रोल टाकून लावली आग
आरोपी महिलांसमोर आपल्या प्रायव्हेट पार्टचे प्रदर्शन करीत असे. अनेकदा त्याला समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तरीही तो ऐकत नव्हता. त्यामुळे संतापलेल्या काही गावकऱ्यांनी त्याच्या अंडरवे्रमध्ये पेट्रोल टाकून थेट आगच लावून दिली. यात त्याचा प्रायव्हेट पार्ट २० टक्के जळाला आहे.
बैतूल : महिलांसमोर प्रायव्हेट पार्टचे( private part) प्रदर्शन करणाऱ्या एका व्यक्तीला गावकऱ्यांनी चांगलीच अद्दल घडवल्याचा प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील(Madhya Pradesh) बैतूल(Baitul) जिल्ह्यातील एका गावात, हा धक्कादायक(Crime) प्रकार घडला आहे. आरोपी महिलांसमोर आपल्या प्रायव्हेट पार्टचे प्रदर्शन करीत असे. अनेकदा त्याला समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तरीही तो ऐकत नव्हता. त्यामुळे संतापलेल्या काही गावकऱ्यांनी त्याच्या अंडरवे्रमध्ये पेट्रोल टाकून थेट आगच लावून दिली. यात त्याचा प्रायव्हेट पार्ट २० टक्के जळाला आहे.
या प्रकरणात रविवारी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. तर एका व्यक्तीवर उपचार सुरु असल्याची माहिती आहे. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील काजली गावात ही भयानक घटना घडली आहे. दीपचंद असे आरोपीचे नाव आहे.
आरोपीच्या कृत्यामुळे महिला संतापल्या होत्या
दीपचंद हा गावातील महिलांसमोर नग्न उभा राहत असे, त्यांच्यासमोर चित्र-विचित्र हावभाव करत असे. तसेच तो अनेकदा महिलांशी विनाकारण वाद घालून त्यांना मारहाणही करीत असे. त्याच्या या वागण्यामुळे गावातील महिला संतापल्या होत्या. यावरुन अनेकदा त्याला गावकऱ्यांनी समजावण्याचा आणि दरडवण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र दीपचंद ऐकत नव्हता. त्याचे हे प्रताप सातत्याने सुरु होते.
गावातील महिलांच्या समोर जाणीवपूर्वक करत होता प्रायव्हेट पार्टचे प्रदर्शन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपचंद गावातील महिलांच्या समोर जाणीवपूर्वक प्रायव्हेट पार्टचे प्रदर्शन करीत असे. गावातल्या लोकांनी त्याला याबाबत अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला होता. मा तो कुणाचेच ऐकत नव्हता. शनिवारीही तो महिलांसमोर नागडा उभा राहिला.
अंडरवेअरमध्ये पेट्रोल टाकून आग लावली
या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सुरेश कावडे आणि कृष्णा उईके यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो त्यांचे ऐकतच नव्हता. दीपचंदच्या या हरकतींना कंटाळलेल्या महिलांनी गावकऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर सुदेश आणि कृष्णा यांनी दीपचंदच्या अंडरवेअरमध्ये पेट्रोल टाकून आग लावली.
प्रायव्हेट पार्ट २० टक्के भाजला
या दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे. तर या घटनेत दीपचंद हा २० टक्के भाजला असून त्याला उपचारासाठी बैतूलच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलेलं आहे. त्याच्याविरोधात छेड काढण्याचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.