बहिणीकडे पाहिले म्हणून भावाने सुरक्षारक्षकाला संपवलं, नाशिक दोन दिवसात दुसरी हत्या
नाशिकच्या म्हसरूळ परिसरात बहिणीकडे वाईट नजरेने बघतो म्हणून वॉचमन आणि बिगारी यांच्यात वाद झाला होता.
नाशिक : नाशिक शहरातील गुन्हेगारी काही केल्या कमी व्हायला तयार नाहीये. नाशिक शहरातील म्हसरूळ परीसरात दोन दिवसात क्षुल्लक कारणावरून दोन हत्या झाल्याचे समोर आले आहे. उसने दिलेले दोन हजार रुपये दिले नाही म्हणून काकानेच हत्या केल्याची बाब समोर आली होती. या घटनेला काही तास उलटत नाही तोच नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. म्हसरूळ परिसरात वाढणे कॉलनीतील हनुमान मंदिर येथील बांधकाम साईटवर ही धक्कादायक घटना समोर घडली आहे. वॉचमन आणि बिगारी यांच्या वादात ही हत्या झाली आहे. बिगारी यांच्या बहिणेकडे वॉचमनने वाईट नजरेने बघतो म्हणून थेट बिगारी याने वॉचमनची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या परिसरातच या दोन्ही घटना घडल्याने म्हसरूळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाशिकच्या म्हसरूळ परिसरात बहिणीकडे वाईट नजरेने बघतो म्हणून वॉचमन आणि बिगारी यांच्यात वाद झाला होता.
नाशिक शहरातील म्हसरूळ परिसरातील वाढणे कॉलनीतील हनुमान मंदिरा जवळ सुरू असलेल्या बांधकाम साईटवर ही घटना घडली आहे.
वॉचमन व बिगारी हे दोन्हीही दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली असून नशेतच ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.
याशिवाय दोन दिवस अगोदर दारूच्या नशेतच मेरी वसाहतीत मावसाने उसने पैसे दिले नाही म्हणून मोबाईल चार्जरच्या सहाय्याने गळा आवळून हत्या केल्याची बाब समोर आली होती.
नाशिकच्या या दोन्ही घटनांनी नाशिक शहर हादरून गेले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
क्षुल्लक कारणावरुन हत्या होऊ लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून नाशिक शहरात नेमकं चाललंय तरी काय अशी चर्चा होऊ लागली आहे.