Jalgaon – नदीत असलेली जनावरे बाहेर काढताना तरुण पाण्यात बुडाला, पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू

ग्रामीण भागात अनेकदा अशा घडल्याचे आपण पाहतो. काल रात्री घडलेली दुर्घटना लोकांच्या जीवारी लागली आहे. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

Jalgaon -  नदीत असलेली जनावरे बाहेर काढताना तरुण पाण्यात बुडाला, पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू
अहमदाबादमधील तरुणाच्या हत्येचे गूढ उकललेImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 11:09 AM

जळगाव – राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे सगळ्या नद्यांना अधिक पाणी आहे. त्याचबरोबर उशिरा सुरु झालेल्या पावसाने जुलै महिन्यात धरणे भरली आहेत. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत कायम वाढ आहे. जळगाव जिल्ह्यात (Jalgaon) एक तरुण जनावरे चारायला गेला होता. घरी येताना काही जनावरे आतमध्ये गेलेली बाहेर येत नव्हती. ती काढण्यासाठी तरुणाने प्रयत्न केले, परंतु काही केल्याने जनावरे बाहेर येत नसल्याने त्यांने नदीच्या (River) काठावर बसून प्रयत्न केले. त्यावेळी त्याचा पाय घसरला आणि तो नदीत कोसळला. त्यावेळी तिथं त्या तरुणासोबत त्याचा चुलत भाऊ देखील होता. त्याने आरडाओरड केली पण तो कुठेच दिसून आला नाही. काहीवेळाने तरूणाचा मृतदेह (deadbody) पाण्यात तरंगू लागला.

नदीच्या पाण्यात बुडून 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

जळगांव जामोद तालुक्यातील मडाखेड येथील सुपेश खंडेराव या 17 वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घटना घडली आहे. यामुळे मडाखेड गावात हळहळ व्यक्त होत आहे. मृतक सूपेश हा आपल्या चुलत भावासोबत नदी जवळील गायरान जमिनीवर आपली जनावरे चरायला घेऊन गेला होता. सायंकाळी जनावरे पाणी पिण्यासाठी नदीत गेले असता त्यातील गाय खोल पाण्यात उतरली. यावेळी सुपेश गायीला हकालण्यासाठी नदी काठावर गेला असता त्याचा पाय घसरला. तो नदीतील खोल पाण्यात पडला. शेजारील शेतकऱ्यांनी हा प्रकार पाहिला असता आरडाओरड केली. तेव्हा परिसरातील शेतकऱ्यांनी नदीकडे धाव घेत सुपेषला पाण्यात शोधले. तो लवकर सापडला नाही. काहीवेळाने सूपेष पाण्यावर तरंगताना दिसला असता त्याला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जळगांव जामोद पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा

मृत्यू लोकांच्या जीवारी लागला

ग्रामीण भागात अनेकदा अशा घडल्याचे आपण पाहतो. काल रात्री घडलेली दुर्घटना लोकांच्या जीवारी लागली आहे. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर जळगांव जामोद पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोहतो येत नसल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.