तेजस मोहतुरे, TV9 मराठी, भंडारा : हल्ली मुलांचं लग्न जुळणं ही मोठी समस्या (Marriage Issue) बनली आहे. लग्न जुळवण्यासाठी वधू-वर सूचक मंडळांमध्ये (Register in Marriage Beauro) नाव नोंदणी करत आहेत. मात्र कधी मनासारखी वधू मिळत नाही तर कधी कुंडलीतील ग्रह आडवे येतात. अशा विविध कारणामुळे लग्न ठरण्यात मोठे अडथळे निर्माण होतात. यामुळे लग्नाचे वय उलटत चालले तरी मुलगी मिळत नसल्याने अनेक तरुणांमध्ये नैराश्येची भावना (Feeling Depressed) निर्माण होत आहे. या नैराश्येतून काही तरुण टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहे.
गेली दोन-तीन वर्षे लग्नासाठी मुलगी शोधत आहे. मात्र अद्याप लग्न जुळत नसल्याने मानसिक तणावातून एका 26 वर्षीय तरुणाने टोकाचा निर्णय घेतल्याची घटना भंडारा जिल्ह्यात उघडकीस आली आहे.
तरुणाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आपली जीवन संपवल्याची धक्कादायक घटना भंडारा तालुक्यातील अंतरगाव येथे घडली आहे. निलेश रामदास सोनटक्के असे 26 वर्षीय मयत तरुणाचे नाव आहे.
शुभम गेली दोन-तीन वर्षे लग्नासाठी मुलगी शोधत होता. नातेवाईक, पाहुण्यांध्ये मुलीचा शोध सुरु होता. तसेच वधू-वर सूचक मंडळातही नाव नोंदवून लग्न जुळवण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र तरीही शुभमचे लग्न जुळता जुळत नव्हते.
निलेशच्या घरच्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ त्याला लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी लाखांदूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.