तरुणाचा तिच्यावर जीव जडला, पण ती दुसऱ्याच्याच प्रेमात धुंद; नाराज तरुणाने केले असे…
मॅकॉयने तरुणीकडे आपले प्रेम व्यक्त केले. मात्र तरुणीने त्याचे प्रेम नाकारले. तरुणीचे दुसऱ्याच मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचे तिने मॅकॉयला सांगितले.
नवी दिल्ली : प्रेमासाठी वाट्टेल ते असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय एका प्रेम प्रकरणाच्या (Love Affair) घटनेत आला आहे. जिच्यावर जीव जडला, ती दुसऱ्याच कुणाच्या प्रेमात धुंद आहे हे कळताच तरुणाने थेट तरुणीच्या प्रियकरालाच संपवण्याचा कट (Plan to Murder) रचला. यासाठी तरुणाने घरात बॉम्ब तयार केला आणि तरुणीच्या प्रियकराला गिफ्टमध्ये पाठवला. तरुणाने गिफ्ट उघडताच बॉम्ब फुटला आणि यात तरुण गंभीर जखमी (Youth Injured) झाला. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.
आरोपी आणि तरुणीची आधीपासून ओळख
अलेक्झांडर मॅककॉय असे या 32 वर्षीय आरोपीचे नाव आहे. तो ओहायो (यूएसए) येथे राहतो. मॅकॉयचे एका मुलीवर खूप प्रेम होते. तरुणीची आणि त्याची काही वर्षांपासून एका सोशल क्लबच्या माध्यमातून ओळख होती.
तरुणीचे दुसऱ्याशी प्रेमसंबंध
मॅकॉयने तरुणीकडे आपले प्रेम व्यक्त केले. मात्र तरुणीने त्याचे प्रेम नाकारले. तरुणीचे दुसऱ्याच मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचे तिने मॅकॉयला सांगितले. यामुळे आपले प्रेम मिळवण्यासाठी मॅकॉयने तरुणीच्या प्रियकरलाच संपवण्याचा कट केला.
आरोपीने घरगुती बॉम्ब तयार केला. हा बॉम्ब तयार करण्यासाठी त्याने विविध ठिकाणाहून रोख पैसे देऊन सामग्री खरेदी केली. यानंतर बॉम्ब तयार केला आणि एका पांढऱ्या रंगाच्या गिफ्ट बॉक्समध्ये पॅक केला.
बॉम्ब तयार करुन तरुणाच्या घरी पाठवला
मॅकॉय हा बॉम्ब घेऊन तरुणीच्या प्रियकराच्या घरी मेरीलँडमधील कॅरोल काउंटीमध्ये गेला. यानंतर मॅकॉयने त्याच्या घराबाहेर पोर्चमध्ये भेटवस्तू ठेवली. भेटवस्तू पाहिल्यानंतर तरुणाच्या आजोबांनी ती घरात आणली. संध्याकाळी तरुण घरी आल्यानंतर त्याने ती भेटवस्तू पाहिली.
बॉम्ब फुटला आणि तरुण गंभीर जखमी झाला
गिफ्ट पाहून तरुणाने तरुणीला फोन करुन तिने गिफ्ट पाठवले का विचारले. पण तितक्यात तो बॉम्ब फाटला आणि यात तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी फेडरल एजन्सींनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. तपासादरम्यान मॅकॉयच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून बॉम्ब बनवण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले. सुरुवातीला मॅकॉयने या घटनेत सहभागी असल्याचे नाकारले, परंतु नंतर त्याने हे मान्य केले.