Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon Crime : भररस्त्यात तरुणाला भोसकले, शाळेसमोरच घडलेल्या घटनेने नागरिकही हादरले !

रविवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मयत तरुण चाळीसगाव शहरातील पोद्दार शाळेजवळून चालला होता. याच दरम्यान काही अज्ञात आरोपी आले आणि तरुणावर जीवघेणा हल्ला करत पळून गेले.

Jalgaon Crime : भररस्त्यात तरुणाला भोसकले, शाळेसमोरच घडलेल्या घटनेने नागरिकही हादरले !
चाळीसगावमध्ये अज्ञात कारणावरुन तरुणाला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 16, 2023 | 1:17 PM

चाळीसगाव : मकरसंक्रातीच्या सणाला गालबोट लावणारी घटना चाळीसगाव शहरात उघडकीस आली आहे. अज्ञात कारणावरुन अनोळखी व्यक्तींनी एका 35 वर्षीय तरुणाची भररस्त्यात चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. दिनेश जाधव असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून, तो चाळीसगावमधील पवारवाडी येथील रहिवासी आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींना अटक झाल्यानंतरच हत्येचे कारण उलगडेल.

मकरसंक्रातीच्या दिवशीच घडली घटना

रविवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मयत तरुण चाळीसगाव शहरातील पोद्दार शाळेजवळून चालला होता. याच दरम्यान काही अज्ञात आरोपी आले आणि तरुणावर जीवघेणा हल्ला करत पळून गेले. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला

नागरिकांनी चाळीसगाव शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

हे सुद्धा वाचा

चाळीसगाव शहर पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल

चाळीसगाव शहर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत पुढील कारवाई सुरु केली आहे. तरुणाला नेमके कुणी मारले? कोणत्या कारणातून त्याची हत्या केली? याबाबत अद्याप कळू शकले नाही. आरोपींच्या अटकेनंतरच सर्व प्रकार उघडकीस येईल. पोलीस प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मात्र या घटनेने संपूर्ण तालुका हादरला असून, परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तत्पूर्वी एकीकडे मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करण्यात येत असताना ह्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस प्रशासन कार्यतत्परतेने प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत.

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.