VIDEO : कारला टेकून उभा होता मुलगा, निर्दयी मालकाने जे केले ते पाहून तुमचाही संताप अनावर होईल
कन्नूर जिल्ह्यातील थलासेरी येथील जुन्या तलासरी बसस्थानकाजवळ गुरुवारी रात्री ही घटना घडली. पीडित बालक एका राजस्थानी कुटुंबातील असून, कामानिमित्त तो केरळमध्ये आला होता.
कन्नूर : केरळमधील कन्नूर जिल्ह्यात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाला असून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. एक सहा वर्षाचा चिमुरडा कारला टेकून उभा होता. यामुळे संतापलेल्या तरुण कारमालकाने चिमुरड्याला जोरदार लाथ मारुन पुढे उडवले. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
कन्नूर जिल्ह्यातील थलासेरी येथील जुन्या तलासरी बसस्थानकाजवळ गुरुवारी रात्री ही घटना घडली. पीडित बालक एका राजस्थानी कुटुंबातील असून, कामानिमित्त तो केरळमध्ये आला होता.
God’s Own County has become the Devil’s Own Land under the @pinarayivijayan regime. A six-year-old Rajasthani boy was kicked and manhandled for leaning on a car. This inhuman incident happend in Thalassery, Kannur.@PrakashJavdekar @AgrawalRMD @BJP4India pic.twitter.com/R0m9nd1sFQ
— K Surendran (@surendranbjp) November 4, 2022
पोन्नियम पालम येथील रहिवासी असलेल्या शिहशाद याने रस्त्यावर आपली कार उभी केली होती. कार उभी करुन काही वस्तू घेण्यासाठी तो दुकानात गेला होता. खेरदी करुन तो परत आला तेव्हा त्याच्या गाडीजवळ एक मुलगा उभा होता.
स्थानिक लोकांनी मुलाला रुग्णालयात नेले
आरोपीचे हे कृत्य तेथील एका सीसीटीव्हीत कैद झाले आहे. आरोपीने मुलाला पाहताच त्याच्या जवळ जात त्याला जोरदार लाथ मारल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यामुळे त्याच्या पाठीला दुखापत झाली आहे.
यानंतर घटनास्थळी उपस्थित लोकांनी मुलाला आरोपीपासून वाचवत उपचारासाठी रुग्णालयात नेले. यानंतर मुलासह पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी आधी गुन्हा दाखल केला नसल्याचा लोकांचा आरोप आहे.
मात्र पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, पोलिसांनी आरोपीविरोधात कलम 308, 323 अंतर्गत अटक केली.
महिला व बालविकास विभागाकडून दखल
महिला व बालविकास विभागानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. याप्रकरणी कठोर कारवाई केली जाईल, असे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले. हे अत्यंत निंदनीय आणि क्रूर आहे. सरकार कुटुंबाच्या पाठिशी उभे राहील.
तसेच केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन यांनीही ट्विट करत लिहिले की, “आधी, सीपीआय(एम) मंत्री यूपीच्या लोकांचा अपमान करतात. आता, काही दुष्ट व्यक्ती एका निष्पाप स्थलांतरिताला लाथ मारतात. लज्जास्पद बाब आहे!”