Ulhasnagar Theft : उल्हासनगरमध्ये तडीपार गुंडाकडून कपड्याच्या दुकानात चोरी, घटना दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद

| Updated on: Aug 10, 2022 | 5:55 PM

सीसीटीव्हीच्या आधारे मध्यवर्ती पोलिसांनी आरोपींचा तपास करून तडीपार गुंड पंकज करोतीया आणि प्रशांत लोखंडे या त्याच्या साथीदाराला उल्हासनगरमधून अटक केली.

Ulhasnagar Theft : उल्हासनगरमध्ये तडीपार गुंडाकडून कपड्याच्या दुकानात चोरी, घटना दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद
वाशीतील बस स्टॉपवर महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

उल्हासनगर : उल्हासनगर शहर आणि ठाणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या गुंडाने त्याच्या साथीदाराच्या मदतीने कपड्यांच्या दुकानात चोरी (Theft) केल्याची घटना उघडकीस आली आहे.चोरीची घटना दुकानातील सीसीटीव्ही (CCTV)त कैद झाली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी तडीपार गुंड आणि त्याच्या साथीदाराला अटक (Arrest) केली असून, आरोपींकडून चोरीचे कपडे हस्तगत केले आहेत. पंकज करोतीया आणि प्रशांत लोखंडे अशी अटक करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली गाडीही हस्तगत केली आहे.

कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात घुसले

उल्हासनगरच्या स्टेशन रोडवर दृष्टी कलेक्शन नावाचे कपड्याचे दुकान आहे. काही दिवसांपूर्वी या दुकानात भरदिवसा दोन अज्ञात तरुण आले आणि शर्ट, पॅन्ट कपडे दाखवण्यास सांगितले. दुकानदाराने कपडे दाखवण्यास सुरुवात केल्यावर ग्राहक म्हणून दुकानात आलेल्या दोघांनी ते कपडे एका जम्बो पिशवीत भरले आणि दुकानदाराला धमकावून कपडे घेऊन निघून गेले. याप्रकरणी दुकानदाराने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी दुकानाचे सीसीटीव्ही तपासले असता आपल्याच पोलीस ठाण्यातून तडीपार करण्यात आलेला गुंड हे कपडे घेऊन गेल्याचं निष्पन्न झालं.

सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींना अटक करत गाडीही केली जप्त

सीसीटीव्हीच्या आधारे मध्यवर्ती पोलिसांनी आरोपींचा तपास करून तडीपार गुंड पंकज करोतीया आणि प्रशांत लोखंडे या त्याच्या साथीदाराला उल्हासनगरमधून अटक केली. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तडीपार गुंड पंकज करोतीया त्याच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून गुन्ह्यात वापरलेली एक गाडी सुद्धा मध्यवर्ती पोलिसांनी जप्त केली आहे. त्यांच्याकडून चोरीचे कपडे सुद्धा हस्तगत केल्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे. (Theft from a clothing store by a goon, the incident of theft was captured on the CCTV in Ulhasnagar)

हे सुद्धा वाचा