Video| बोलता, बोलता महिलांनी लांबवले लाखो रुपयांचे दागिने; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, नाशिकमधील धक्कादायक प्रकार

नाशिकमधून (Nashik) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील सराफा बाजारात (Bullion Market) भर दुपारी चोरी झाल्याची घटना घडली आहे. भागीरथी ज्वेलर्समध्ये लहान मुलीसोबत आलेल्या तीन महिलांनी (Women) सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स लांबविला आहे.

Video| बोलता, बोलता महिलांनी लांबवले लाखो रुपयांचे दागिने; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, नाशिकमधील धक्कादायक प्रकार
नाशिकमध्ये सराफा बाजारात चोरी
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 7:08 PM

नाशिक : नाशिकमधून (Nashik) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील सराफा बाजारात (Bullion Market) भर दुपारी चोरी झाल्याची घटना घडली आहे. भागीरथी ज्वेलर्समध्ये लहान मुलीसोबत आलेल्या तीन महिलांनी (Women) सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स लांबविला आहे. या बॉक्समध्ये तब्बल साडेचार लाखांचे दागिने होते. या महिलांनी दागिन्यांचा बॉक्स घेऊन पळ काढला. ही चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चोरीची घटना लक्षात आल्यानंतर ज्वलर्सच्या मालकाकडून अज्ञात आरोपीविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेज्या आधारे आरोपी महिलांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. लहान मुलीच्या मदतीने या महिला चोरी करत असल्याचे समोर आले आहे.

नजर चुकवून लांबवला सोन्याच्या दागिन्याचा बॉक्स

घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील सराफा बाजारात भागीरथी नावाचे एक ज्वेलर्स आहे. संबंधित महिला चोरीच्या उद्देशाने या ज्वेलर्समध्ये शिरल्या, तीन महिलांसोबत एक लहान मुलाग देखील होता. या महिलांनी सोने खरीदीच्या बहाण्याने दुकानात प्रवेश केला. दुकानात प्रवेश केल्यानंतर संबंधित महिलांनी दुकानदाराची नजर चूकवून दागिन्याचा एक बॉक्स लंपास केला.

आरोपींविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान चोरीची घटना लक्षात आल्यानंतर ज्वलर्सच्या मालकाने आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, आता पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या महिलांचा शोध घेत आहेत. या महिला चोरीसाठी लहान मुलांचा वापर करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या

राम तेरी गंगा मैली, आधी प्रेम नंतर लोच्या- मग एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा का काढला काटा?

विक्की नगराळेला फाशीची शिक्षा का नाही? उज्वल निकमांनी कारण सांगितलं, पुन्हा कोर्टात खटला जाणार?

Hinganghat जळीतकांड निकाल : विक्की नगराळेला मरेपर्यंत जन्मठेप, एकतर्फी प्रेमातून तरुणीला जिवंत जाळल्याप्रकरणी महत्त्वपूर्ण निकाल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.