सोशल मीडिया साईटवरून प्रेमात पडले, एकत्र जगण्या-मरण्याचे वचनही दिले, पण नोकरी लागताच पण नोकरी लागताच प्रेमाचा ‘द एंड’
प्रेमाच्या जाळ्यात ओढून, लग्नाचे वचन देऊन आधी शारीरिक जवळीक साधली. मात्र त्यानंतर शब्द फिरवून लग्नास नकार दिला, असा आरोप एका युवतीने तरूणावर लावला आहे.

अमेठी | 17 ऑगस्ट 2023 : उत्तर प्रदेशच्या अमेठीतील बरेलीमध्ये SDM ज्योति मौर्य सारखी आणखी एक केस समोर आली आहे. पण इथलं प्रकरण उलटं आहे, इथे एका युवतीने नव्हे तर एका युवकाने नोकरी मिळाल्यावर (refused to marry girl after getting job) त्या तरूणीशी असलेले संबंध संपवले. याप्रकरणी पीडित युवतीने आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपी तरूण बेरोजगार होता तोपर्यंत त्याने आपल्याशी गोड बोलून, लग्नाचे वचन देऊन जवळीक साधली. मात्र त्याला नोकरी मिळताच तो दूर राहू लागला आणि लग्न करण्यासही नकार दिला. सध्या या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.
खरंतर, अमेठी जिल्ह्यातील रामशाहपूर गावात राहणाऱ्या आदित्यची मार्च 2021 मध्ये इंस्टाग्रामवर प्रतापगड जिल्ह्यातील एका गावातील मुलीशी मैत्री झाली होती. दोघांमध्ये बोलणे सुरू झाले, त्यानंतर काही दिवसांनी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रेमात पडल्यानंतर दोघांची भेट होऊ लागली आणि हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले. लग्नाचे आश्वासन देऊन तरुणाने तिच्याशी शारीरिक संबंधही ठेवले.
इन्स्टाग्रामच्या स्टोरीचा नोकरी मिळताच ‘द एंड’
इन्स्टाग्रामवर दोन वर्षांपूर्वी ओळख, मग मैत्री झाली , प्रेमाच्या आणाभाका घेतल्या, लग्नाचे वचनही दिले आणि शारीरिक जवळीकही झाली. दोन वर्ष सगळं काही ठीक सुरू होतं. पण तेवढ्यातच आरोपी युवकाला नोकरी मिळाली, त्यानंतर तो त्याच्या प्रेमिकेपासून दूर राहू लागला. आरोपी आदित्यने लग्नाचे वचन देऊन शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप युवतीने केला आहे. तेवढ्यात आरोपी तरूणाला भारतीय स्टेट बँकेमध्ये नोकरी लागली आणि तो प्रेमिकेपासून दूर राहू लागला.
लग्नाचा प्रस्ताव घेऊन ती स्वत: त्याच्या घरी गेली
त्यानंतर पीडत युवतीने त्याच्यासमोर लग्नाचा विषय काढला. तिने तिच्या कुटुंबियांनाही त्याच्या घरी पाठवले, मात्र त्यावर काहीच उत्तर आले नाही. अखेर पीडित युवती स्वत: त्याच्या घरी लग्नाविषयी बोलण्यासाठी गेली मात्र पदरी निराशाच आली. त्यानंतर आरोपी कसाबसा तयार झाला, मात्र थोड्या दिवसांनी पुन्हा त्याने लग्नास नकार दिला. यामुळे निराश झालेल्या आणि संतापलेल्या तरूणीने आरोपी आदित्यविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करत न्यायाची मागणी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून ते पुढील तपास करत आहेत.