Nagpur Crime : मोठ्या शहरात जायचे, गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरायचे, आंतरराज्यीय टोळी नागपूर पोलिसांच्या जाळ्यात

पाच-सहा जणांची टोळी होती. हे मूळचे छत्तीसगडचे. मोठ्या शहरात जायचे. त्याठिकाणी गर्दीचं ठिकाण शोधायचे. गर्दीत मोबाईल लंपास करायचे.

Nagpur Crime : मोठ्या शहरात जायचे, गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरायचे, आंतरराज्यीय टोळी नागपूर पोलिसांच्या जाळ्यात
आंतरराज्यीय टोळी नागपूर पोलिसांच्या जाळ्यात
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 10:13 PM

नागपूर : नागपूर पोलिसांनी मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अटक केली. मोमिनपुऱ्यातील (Mominpura) एका हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली. मोबाईल चोरणारी ही आंतरराज्यीय टोळी ( Inter-State Gang) गुन्हे शाखेच्या (Crime Branch) हाती लागली. यामध्ये एका अल्पवयीनासह पाच जणांना अटक करण्यात आली. या आरोपीकडून 16 मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपी मूळचे झारखंडचे रहिवासी आहे. ते वेगवेगळ्या शहरात मोबाईल चोरत असल्याचं समोर आलं. एखाद्या शहरात जायचं. हॉटेलमध्ये राहायचं. गर्दीच ठिकाण शोधायचं. गर्दीच्या ठिकाणी, बाजारात फिरून लोकांचे मोबाईल चोरायचे.

सापळा रचून टोळीला अटक

गेल्या आठ-दहा दिवसांपासून ही टोळी नागपुरात आली होती. मोमिनपुरा परिसरात हॉटेलमध्ये राहत होते. ते मोबाईल चोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या टोळीनं आतापर्यंत नागपूर, चंद्रपूर यवतमाळ, गोंदिया या शहरातून मोबाईल चोरी केली. गुन्हे शाखेच्या युनिट एकला या टोळीची माहिती मिळाली. सापळा रचून या टोळीला हॉटेलमध्येच पकडले. झडती घेतली असता आरोपीकडून 16 मोबाईल, दोन चाकू कटर असा तीन लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल आढळला. आरोपीच्या चौकशीत अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे. या दिशेने पोलीस तपास करीत आहे.

कशी होती चोरीची पद्धती

पाच-सहा जणांची टोळी होती. हे मूळचे छत्तीसगडचे. मोठ्या शहरात जायचे. त्याठिकाणी गर्दीचं ठिकाण शोधायचे. गर्दीत मोबाईल लंपास करायचे. त्यानंतर काही मोबाईल विकायचे. यातून त्यांना पैसे मिळत असतं. ही टोळी गेल्या काही दिवसात नागपुरात आली होती. मोमिनपुरा भागात पोलिसांनी चौकशी केली. हॉटेलमध्ये राहणाऱ्या या चोरट्यांकडं तब्बल 16 मोबाईल सापडले. दोन चाकू कटरही होते. पोलिसांनी पाच जणांना अटक केली. या चोरट्यांनी आतापर्यंत किती चोऱ्या केल्या. किती मोबाईल लंपास केले. याचा शोध आता पोलीस घेत आहेत. मोठ्या प्रमाणात मोबाईल लंपास केली असल्याची शक्यता आहे. या टोळीसोबत आणखी कोणी सहभागी आहेत का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.