Theft : चोरीचा डाव फसला नाही, पण चोरट्यानेच परत केला लाखोंचा मुद्देमाल, चिठ्ठी लिहून मागितली माफी.. देवाने दाखविला असा चमत्कार..

Theft : दैवाचा कोप काय असतो हे तुम्हाला माहिती आहे का? तर ही बातमी वाचाच..

Theft : चोरीचा डाव फसला नाही, पण चोरट्यानेच परत केला लाखोंचा मुद्देमाल, चिठ्ठी लिहून मागितली माफी.. देवाने दाखविला असा चमत्कार..
शिकारी खुद यहा शिकार हो गयाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 29, 2022 | 4:34 PM

बालाघाट : तर बातमी आहे मध्यप्रदेशातील बालाघाट (Balaghat) येथील. बालाघाटमधील एका मदिरात या 24 ऑक्टोबर रोजी चोरी (Theft) झाली होती. चोरांनी जैन मंदिरातील (Temple) देवाचा किंमती ऐवज चोरला. जालना येथील जांब समर्थ येथील 15 व्या शतकातील देवाच्या मूर्ती जशा चोरीला गेल्या आणि त्यानंतर पोलिसांना (Police) दोन महिने दमछाक करणारा तपास करावा लागला. तसे मात्र या प्रकरणात काही घडले नाही..इथं ‘शिकारी खुद शिकार हो गया..’

चोरट्याने लाखोंचा ऐवज लंपास तर केला. त्याचा मागमूसही कोणाला लागला नाही. पोलिसांचा तपास सुरु होता. दरम्यान एक आश्चर्यकारक घटना घडली. चोरट्याने स्वतःहून सर्वाच सर्व मुद्देमाल जशाच तसा परत केला.

बरं एवढ्यावर हे प्रकरण लपलं नाही. चोराने हा मुद्देमाल परत करताना त्याने एक चिठ्ठी ही लिहिली. चिठ्ठी कसली त्याने आपली आपबित्तीची मांडली. चिठ्ठी हे तर निमित्त होतं. त्याने देवाच्या दारात केलेल्या चोरीचा पश्चाताप व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

चोराचे हे पत्र सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले. चोरी केल्यावर स्वतःहून देवाचा ऐवज त्याने परत का केला याची चर्चा झाली. चोराने मंदिरातून 9 चांदीचे छत्र आणि इतर ऐवज चोरला होता. तो त्याने परत केला.

‘माझ्याकडून चूक झाली. मी त्याबद्दल क्षमा मागतो. माझ्या या चोरीमुळे आणि चोरीच्या मुद्देमालामुळे खूप नुकसान झाले. त्यामुळे मी हा मुद्देमाल परत करत आहे.’, अशी चोराने या पत्रात कैफियत मांडली.

चोराने या चिठ्ठीत विनंती केली आहे की, ‘ ज्याला कोणाला हे देवाचे सामान मिळेल, त्याने ते जैन मंदिरात परत करावे’. चोराने हे सामान मंदिराबाहेरील पंचायत भवनाच्या ओट्यावर आणून ठेवले. पण त्याची मंदिरात जाण्याची हिंमत झाली नाही.

आता या चोराबद्दल सर्वांची उत्सुकता वाढली आहे. पण चोराने त्याच्याविषयीची काहीच माहिती दिली नाही. पोलिस या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय राहणार नाहीत. ते त्याचा पत्ता शोधून काढतीलच.

पण या चोराने स्वतःला एक भारी उपमा दिली आहे. ‘एक बेपत्ता रहिवासी’, अशी त्याने स्वतःची ओळख दिली आहे. आता हा बेपत्ता रहिवासी पोलिसांच्या कोठडीत कधी मुक्कामाला येतो हे लवकरच कळेल..

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.