मुंबईतून सटकला, कल्याणमध्ये अडकला; ‘असा’ लागला पोलिसांच्या हाती
तपास अधिकारी अनिल गायकवाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून कल्याण नजीक असलेल्या मोहने परिसरात दोघांच्या मुसक्या आवळल्या.
कल्याण / सुनील जाधव (प्रतिनिधी) : मुंबईतून नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलेल्या आरोपी (Accuse)च्या कल्याणमध्ये मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आहे. नाकाबंदी (Blockade) वेळी ड्युटीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला यावेळी त्याने जखमी केले होते. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ कल्याण पोलिसांच्या हाती लागला आहे. कल्याणमधील एका चोरी प्रकरणात त्याला अटक (Arrest) केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. आरोपीकडून चैन स्नॅचिंग आणि मोटरसायकल चोरीच्या एकूण 18 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
आंबिवली परिसरात महिलेची सोनसाखळी हिसकावली
कल्याण डोंबिवली शहरात दुचाकी चोरी आणि चैन चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आंबिवली रेल्वे स्टेशनजवळ पायी चालत असताना एका महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्या गळ्यातील 15 ग्रॅम सोन्याची चैन हिसकावून दोघे जण पळून गेले होते.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून केले अटक
याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकारी अनिल गायकवाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून कल्याण नजीक असलेल्या मोहने परिसरात दोघांच्या मुसक्या आवळल्या.
दोघेही आरोपी अट्टल गुन्हेगार
सुनील उर्फ सोन्या शंकर फुलारे आणि गणेश जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी सुनील हा चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील अट्टल आरोपी असून त्याचा साथीदार अब्दुला इराणी हा फरार आहे. गणेश हा दुचाकी चोरीतील अट्टल गुन्हेगार आहे.
आरोपींकडून 18 गुन्हे उघडकीस
पोलिसांनी खडकपाडा येथील चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांसह इतर 7 चैन स्नॅचिंग आणि 11 मोटरसायकय चोऱ्या असे एकूण 18 गुन्हे उघडकीस आले आहेत. सुनील हा दागिने हिसकावण्यासाठी चोरीच्या बाईक वापरत होता.
9 लाख 60 हजाराचा मुद्देमाल हस्तगत
चुनाभट्टी परिसरात नाकाबंदीतून सुनील हा पसार झाला होता. यावेळी त्याने पोलीस कर्मचाऱ्यालाही जखमी केलं होतं. त्याचा हा कारनामा सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. या दोघांकडून 9 लाख 60 हजाराच्या मोटार सायकली, 60 हजार किंमतीची सोन्याची चेन हस्तगत करण्यात आले.
मुंबई, नवी मुंबई, कल्याण, भिवंडी, ठाणे, उल्हासनगर, मुंब्रा, अंबरनाथ इत्यादी ठिकाणी चोऱ्या केल्यात.