एक-दोन नव्हे, चाळीस घरं फोडली, अट्टल चोरटे गजाआड, एक किलो सोनं जप्त
आंध्र प्रदेश पोलिसांनीही या चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गेल्या महिनाभरापासून हे चोरटे पोलिसांना चुकवत होते.
सोलापूर : घरफोड्या करणाऱ्या अट्टल दरोडेखोरांना अखेर सोलापूर पोलिसांनी अटक (Thieves Arrested By Solapur Police) केली आहे. आंध्र प्रदेश पोलिसांनीही या चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गेल्या महिनाभरापासून हे चोरटे पोलिसांना चुकवत होते. अखेर आता सोलापूर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. आंध्र प्रदेशात या चोरट्यांनी तब्बल 40 ठिकाणी चोरी केली (Thieves Arrested By Solapur Police).
महिनाभरापासून आंध्र प्रदेश पोलिसांना चकवा
आंध्र प्रदेश पोलिसांना गेल्या महिनाभरापासून हे दोन अट्टल दरोडोखोर चकवा देत होते. सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलिसांनी या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी नागूराज जक्कमशेट्टी, भोला नागसाई, असे दोन्ही अट्टल घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगारांचं नाव आहे. त्यांनी 9 फेब्रुवारीला ते नळदुर्गजवळील फुलवाडी टोल नाक्यावरुन पोलिसांना गुंगारा देत टोल नाक्याजवळील बॅरिगेट्स तोडले होते.
हे दोन्ही आरोपी पुन्हा सोलापुरातील सोरेगाव परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे विजापूर पोलिसांनी या गुन्हेगारांना पकडण्यासाठी सापळा रचला आणि दोन्ही चोरट्यांना अटक केली (Thieves Arrested By Solapur Police).
एक किलो सोने, पाच किलो चांदी जप्त
विजापूर नाका पोलिसांनी त्यांच्याकडून एक किलो सोने, पाच किलो चांदी, साडेतीन लाख रुपये रोकड जप्त केलं आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींनी आंध्र प्रदेशात तब्बल 40 ठिकाणी चोरी केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. ते सोलापुरातील आपल्या पाहुण्याकडे स्थायिक होण्यासाठी सोलापुरात सामान घेऊन आले होते. त्यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
Sonali Phogat | भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या घरी चोरी, 10 लाख रोकड, दागिने लंपासhttps://t.co/pWX7wdTpm6#sonaliphogat #Robbery
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 16, 2021
Thieves Arrested By Solapur Police
संबंधित बातम्या :
चंद्रपूर जिल्हा बँकेच्या घोटाळ्यात नवनवे खुलासे, ग्राहक हादरले, अफरातफर करणारा रोखपाल मोकाट?
केजरीवालांच्या कन्येची 34 हजारांना फसवणूक, तिघांना अटक, मास्टरमाईंड परागंदा
आईची नजर हटताच भामट्याने चिमुकलीला पळवलं, 24 तास उलटूनही शोध नाही