भरदिवसा सिनेस्टाईल थरार.. व्यावसायिकावर चाकू हल्ला करत लुटले ५ लाख ! कुठे घडली ही घटना ?

शहरातील चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहर आणि तालुक्यातील व्यवसायिकांच्या लुटीच्या घटना वारंवार होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत व्यावसायिकावर हल्ला करण्यात आला.

भरदिवसा सिनेस्टाईल थरार.. व्यावसायिकावर चाकू हल्ला करत लुटले ५ लाख ! कुठे घडली ही घटना ?
Follow us
| Updated on: Sep 15, 2023 | 10:09 AM

मालेगाव | 15 सप्टेंबर 2023 : शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण आणि तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिक जीव मुठीत धरून जगत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना शहरात पुन्हा घडली आहे. व्यावसायिकावर पाळत थेऊन चोरट्यांनी त्यांच्यावर (robbery crime) हल्ला करत लाखो रुपये लुटल्याची घटा उघडकीस आली आहे. या चाकू हल्ल्यात सदर व्यावसायिक गंभीर जखमी झाले आहे. या आठवड्यातील गुन्ह्याची ही तिसरी घटना आहे. शहरात चोऱ्यांच्या घटना वाढल्या असून शहर आणि तालुक्यातील व्यवसायिकांच्या लुटीच्या घटना वारंवार होत आसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

भरदिवसा रंगला सिनेस्टाइल थरार

मालेगावमधील यंत्रमाग व्यवसायिक शांताराम मालपुरे हे कामगारांचे वेतन देण्यासाठी बँकेत पैसे काढण्यास गेले होते. बँकेतून त्यांनी सुमारे ५ लाख रुपयांची रक्कम काढली व ते घरी जात होते. मात्र चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली होती. मालपुरे हे बँकेबाहेर पडताच त्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला व एके ठिकाणी त्यांना अडवून चाकूने धमकावत पैसे देण्यास सांगितले. मालपुरे यांनी त्यांना प्रतिकार केला असता चोरट्यांनी त्यांच्या हातावर वार केला, ज्यामध्ये त्यांच्या हाताला इजा होऊन ते गंभीर जखमी झाले.

मात्र त्याचवेळी त्यांनी आरडाओरडा केल्याने आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. ते पाहून बदमाश चोरट्यांनी मालपुरे याची गाडी आणि पैसे घेऊन तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिकांनी धाव घेत त्यांचा पाठलाग केल्याने तिघा चोरट्यांपैकी एकास पकडण्यात त्यांना यश मिळाले. त्यांनी त्या चोरट्याला बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीकडून गावठी कट्टा व धारधार चाकू जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा जाखल करण्यात आला असून पोलिस इतर दोन आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

दरम्यान यंत्रमाग कारखान्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी यंत्रमाग व्यावसायिकांच्या शिष्ठमंडळाने अपर पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

या हल्ल्यात मालपुरे यांच्या जीवावरच बेतले असते. पण सुदैवाने त्यांच्या हातावर निभावले. मात्र असे असले तरी त्यांच्या हाताला मोठी इजा झाली आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान मालेगावमध्ये चोऱ्यांच्या घटना वाढल्या असून शहर आणि तालुक्यातील व्यवसायिकांच्या लुटीच्या घटना वारंवार होत आसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.