Dombivali Theft : डोंबिवलीत बंद बंगल्यात घरफोडी, चोरट्यांनी 16 लाखांचा ऐवज केला लंपास

खिडकीच्या जाळ्या लोखंडी कटावणीने वाकवून घरात प्रवेश करुन किमतीचे हिरे, सोन्याचे दागिन्यांचा ऐवज चोरुन नेला. एमआयडीसी हद्दीत अनेक दिवसांपासून बंद असलेल्या चोऱ्या पुन्हा सुरू झाल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे.

Dombivali Theft : डोंबिवलीत बंद बंगल्यात घरफोडी, चोरट्यांनी 16 लाखांचा ऐवज केला लंपास
डोंबिवलीत बंद बंगल्यात घरफोडीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 9:25 PM

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी भागातील बंद असलेल्या एका बंगल्यात घरफोडी (Robbery) करत चोरट्याने घरातील 16 लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. खिडकीच्या जाळ्या लोखंडी कटावणीने वाकवून घरात प्रवेश करुन किमतीचे हिरे, सोन्याचे दागिन्यांचा ऐवज चोरुन नेला. एमआयडीसी हद्दीत अनेक दिवसांपासून बंद असलेल्या चोऱ्या पुन्हा सुरू झाल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. याप्रकरणी बंगल्याच्या मालक प्रजना राय शेट्टी यांनी मानपाडा पोलीस (Manpada Police) ठाण्यात चोरीचा तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी गुन्हा दाखल (Case Filed) करुन तपास सुरू केला आहे. एमआयडीसीच्या अनेक भागातील रस्त्यांवर पथदिवे चालू नाहीत. ते चालू करण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

सोने, हिऱ्याचे 16 लाखाचे दागिने केले लंपास

डोंबिवलीत एमआयडीसी परिसरात मिलाप नगरमध्ये प्रजना राय शेट्टी यांचा आरएल 111 यश बंगला आहे. प्रजना या सिटी रुग्णालयात व्यवस्थापक म्हणून काम करतात. गुरुवारी त्या कामावर गेल्या असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याच्या पाठीमागील बाजुकडील खिडकीच्या जाळ्या धारदार कटावणीने वाकवल्या. तेथून घरात प्रवेश केला. घरातील किंमती ऐवज, पैशांसाठी घरातील सामानाची नासधूस केली. तेथे काही आढळले नाही म्हणून चोरट्याने तक्रारदार प्रजना यांची मुलगी सलोनी हिच्या बेडरूममधील लाकडी कपाटातल्या कुलुपबंद खणात ठेवलेले सोने, हिऱ्याचे 16 लाख रुपये किमतीचे हिरे, सोन्याचे दागिने चोरुन नेले.

शेट्टी कामावरुन घरी आल्यानंतर चोरीची घटना उघड

प्रजना शेट्टी गुरुवारी सकाळी घरी आल्या, त्यावेळी त्यांना घराच्या पाठीमागील खिडकी तोडलेली दिसली. घरात सामानाची फेकाफेक केलेली, तसेच कपाट उघडे असल्याचे दिसले. घरातील किमती ऐवज चोरीला गेल्याने प्रजना शेट्टी यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार केली. एमआयडीसीच्या निवासी विभागात नियमितपणे चोऱ्या-घरफोड्या होत असतात. पोलिसांनी गस्त वाढविल्याने चोऱ्या गेल्या दोन महिन्यांपासून बंद झाल्या होत्या. चोऱ्या पुन्हा वाढल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (Thieves broke into a bungalow in Dombivli and looted 16 lakhs)

हे सुद्धा वाचा

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.