ज्वेलरी शॉपमध्ये घुसण्यासाठी चोरट्यांनी भूयार खणले, दुसऱ्याच दुकानातून बाहेर आले

| Updated on: Mar 03, 2023 | 9:37 AM

चोरट्यांनी भुयार खणून त्याव्दारे ज्वेलरी शॉप लुटण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे ज्वेलरी व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.

ज्वेलरी शॉपमध्ये घुसण्यासाठी चोरट्यांनी भूयार खणले, दुसऱ्याच दुकानातून बाहेर आले
MEERUT
Image Credit source: socialmedia
Follow us on

मेरठ : मेरठमध्ये पुन्हा एका सराफाचे दुकान लुटण्यासाठी चोरट्यांनी चक्क भुयार खणून शिरण्याचा प्रयत्न केला, परंतू यावेळी हे भूयार दुसऱ्याच दुकानात उघडले गेल्याने चोरट्यांचा हिरमोड झाला आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी याच दुकानात अशाच प्रकारे यशस्वीपणे दरोडा टाकला होता. मेरठमध्ये चोरी करण्यासाठी भूयार खणण्याचा हा तिसरा प्रकार असल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील ज्वेलर्सनी आंदोलन करीत पोलीसांच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित केला आहे.

मेरठमध्ये भुयार खणून त्याव्दारे ज्वेलरी शॉप लुटण्याचा प्रयत्न घडला आहे. परंतू हे भूयार दुसऱ्याच दुकानात उघडल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला आहे. विशेष म्हणजे चोरटे अशाच प्रकारे याच दुकानात 2022 मध्ये घुसून त्यांनी हे सोन्याचे दुकाने लुटले होते. मेरठ शहरात अशाप्रकारे चोरीसाठी भूयार खणण्याची ही तिसरी घटना असल्याने पोलिसही हैरान झाले आहेत. मेरठमध्ये अशा प्रकारे चोरट्यांनी भूयार खणल्याने तेथील सराफांनी एकत्र येऊन पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करीत आंदोलनाचा पवित्रा केला आहे. त्यानंतर पोलीसानी लवकरच याप्रकरणातील आरोपीना अटक केली जाईल असे म्हटले आहे.

दुकानात निघाले भूयार

मेरठच्या नौचंडी पोलीस ठाणे क्षेत्रातील गढ रोडजवळील प्रिया ज्वेलर्स आहे. या ज्वेलर्समध्ये घुसण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. त्यासाठी मोठे भूयार खणण्यात आले. मात्र या भूयाराचे टोक भलत्याच दुकानातून बाहेर आल्याने चोरट्यांचा डाव फसला आहे. हे भूयार ज्या दुकानातून बाहेर आले ते दुकान एका घरात असून त्या घरातील माणसांना रात्री आवाजाने जाग आली तेव्हा या भूयाराबद्दल त्यांना कळले. दरम्यान ज्या दुकानात हे भूयार निघाले आहे, तेथे लुटण्यासाठी काहीच नव्हते. त्यामुळे चोरट्यांचा प्रयत्न फसले आहेत.

एकाच दुकानात दोनदा भूयार 

25 ऑगस्ट 2022 मध्येही याच प्रिया ज्वेलर्समध्ये चोरी करण्यासाठी चोरटे अशाप्रकारचे भूयार खणून घुसले होते आणि लाखोंचा माल लुटला होता. तेव्हा ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली होती. त्यावेळी चोरट्यांनी नाल्यातून भूयार खणले होते.यंदा चोरट्याने खणलेले भूयार नेमके कुटून खणायला सुरूवात केली होती त्याचे सुरूवातीचे टोक पोलीसांना सापडलेले नाही. पोलिस ते शोधत आहेत.

भूयार आतून ब्लॉक

एका पोलिसाला भूयाराच्या आत सोडले असता आतून ते भूयार आतून ब्लॉक असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांना घटनास्थळी दोन सिलिंडर आणि गॅस कटर जप्त केले आहेत. ज्वेलरी दुकानाते मालक हेमेंद्र राणा  यांनी सांगितेले की  25 ऑगस्ट 2022 मध्ये सुद्धा त्यांच्याकडे अशीच चोरी झाली होती, त्यावेळी सीसीटीव्ही चोरटा दिसत होता. गुरूवारी सकाळी शेजारच्या दुकानात भूयार सापडल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस आता शोध घेत आहेत.