चोरांनी नेमकी संधी शोधली, बारावीचे मुलं परीक्षा देत होते, विद्यार्थी सांगूनच केंद्रात गेला पण…

राज्यभर बारावीच्या परीक्षा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर नियमांचे पालन परीक्षा केंद्रांवर केले जात आहे. मोबाईल बाळगणे यास परवानगी नाही. त्यामुळे वर्गाच्या बाहेरच मुलं आपल्या वस्तु ठेवत आहे.

चोरांनी नेमकी संधी शोधली, बारावीचे मुलं परीक्षा देत होते, विद्यार्थी सांगूनच केंद्रात गेला पण...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 7:51 AM

नाशिक : सध्या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डच्या परीक्षा ( 12th Exam ) सुरू आहे. 21 तारखेपासून या परीक्षेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बोर्ड ची परीक्षा महत्वाची मानली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या संदर्भात काहीसं टेन्शन असतं. पण, नाशिकमधील ( Nashik Crime News ) विद्यार्थ्यांना आता दुसरंही टेन्शन आले आहे. एका शाळेतून बारावीच्या विद्यार्थ्यांचे अकरा मोबाईल चोरीला गेल्याचे समोर आले आहे. नाशिकरोड येथील के जे मेहता हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला आहे. परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रात विद्यार्थी बसलेले असतांना बाहेरून विद्यार्थी सांगून आलेल्या एका भामट्याने मोबाईल लंपास केले आहे.

राज्यभर बारावीच्या परीक्षा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर नियमांचे पालन परीक्षा केंद्रांवर केले जात आहे. मोबाईल बाळगणे यास परवानगी नाही. त्यामुळे वर्गाच्या बाहेरच मुलं आपल्या वस्तु ठेवत आहे.

विद्यार्थ्यांनी बाहेर ठेवलेले दप्तर पाहून चोरांनो बरोबर संधि शोधली आणि के जे मेहता हायस्कूलमधून 11 मोबाईल चोरून नेले आहे. मोबाईल चोरीला गेल्याने विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.

हे सुद्धा वाचा

वर्गात परीक्षेला जात असतांना बाहेर ठेवलेल्या वस्तु चोरीला तर जात नाही ना? अशी धाकधूक विद्यार्थ्यांच्या मनात येऊ लागली आहे. अशातच मोबाईल चोरीला गेलेला असतांना अनेकांची मोठी गैरसोय झाली होती.

चोरांनी 11 मोबाईलवर डल्ला मारत असतांना हायस्कूलमधील शिपाई, शिक्षक काय करत होते? असाही प्रश्न पालक वर्गातून उपस्थित केला जात आहे. काही क्षणातच हे मोबाईल चोरी गेल्याने चोरीची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

चोरांनी बारावीच्या परीक्षा सुरू असल्याचा फायदा घेऊन अकरा मोबाईलवर डल्ला मारल्याची बाब संपूर्ण राज्यभर चर्चेचा विषय ठरत असून विद्यार्थ्यांनी मोबाईल आणू नये अशी सूचना ठिकठिकाणी दिली जात आहे.

उपनगर पोलीस ठाण्यात याबाबत काही पालकांनी माहिती दिली असून उपनगर पोलीसांनी चोरट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. वर्गाबाहेर कोण कोण आले होते याचा शोध घेणं पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे.

परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थी आणि त्याच्या पालकांसोबत परीक्षा झाल्यावर संवाद व्हावा. किंवा सोबत आलेल्या पालकांची भेट होण्यासाठी तात्काळ संवाद व्हावा यासाठी विद्यार्थी मोबाईल आणतात.

पण हीच संधी शोधून चोरट्यांनी जो डल्ला मारला आहे. तशी घटना घडू नयेयासाठी शाळा प्रशासनाने काळजी घेणं सुरू केलं असलं तरी सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यावर नजर ठेवता येईल का ? याचाही विचार शाळा प्रशासन करत आहे.

खरंतर परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी मोबाईल बाळगणे किंवा वापरणे गैर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ते बाहेर ठेवण्याची सक्ती केली जाते. हीच सक्ती चोरट्यांनी हेरून केलेली चोरी आता उघडकीस आणण्यासाठी शाळेसह पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिले आहे.

दरम्यान विद्यार्थ्यांनी देखील यापुढे मोबाईल घेऊन जात असतांना काळजी घेण्याची गरज आहे. मोबाईल आणू नये असेच आवाहन शिक्षण विभाग आणि शाळा प्रशासन करीत आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.