Dombivali Theft : डोंबिवलीत अनोखी चोरी, घर फोडून चोरट्यांनी केले तब्बल 16 नळ लंपास

घरातील कुठलीही वस्तू चोरीला गेली नव्हती जोंधळे यांनी आश्चर्यचकित होऊन घरामध्ये पुन्हा एकदा पाहणी केली. यावेळी त्यांची नजर घराच्या स्वच्छतागृह, स्नानगृह आणि किचनमध्ये लावलेल्या नळाकडे गेली असता, हे नळ चोरट्यांनी लंपास केल्याचे त्याच्या लक्षात आले.

Dombivali Theft : डोंबिवलीत अनोखी चोरी, घर फोडून चोरट्यांनी केले तब्बल 16 नळ लंपास
डोबिवलीत घर फोडून चोरट्यांनी केले तब्बल 16 नळ लंपासImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 12:51 AM

डोंबिवली : डोंबिवली पश्चिम येथे एक अनोखी चोरी (Theft) घडली आहे. या चोरीत चोरट्यांनी घरातील मौल्यवान वस्तू सोडून स्नानगृह, स्वच्छतागृह, आणि किचनमधील असे 16 नळ (Tap) काढून लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. डोंबिवली पश्चिमेकडील शिवनेरी सोसायटीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी घर मालक किशोर भाऊसाहेब जोंधळे यांच्या तक्रारीनंतर विष्णुनगर पोलिसां (Vishnu Nagar Police)नी गुन्हा दाखल करत चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. चोरट्याने घरात घुसून मौल्यवान वस्तू चोरण्याऐवजी केवळ नळ चोरल्याने पोलीसही आश्चर्यचकित झाले असून, चोरटे प्लंम्बर असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

चोरट्यांनी केवळ घरातील नळ चोरुन नेल्याने पोलीसही चक्रावले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिम भागातील शिवनेरी सोसायटीत किशोर भाऊसाहेब जोंधळे हे कुटुंबासह राहतात. जोंधळे कुटुंब 28 जुलै ते 7 ऑगस्ट यादरम्यान काही कामनित्ताने बाहेरगावी गेल्याने घराला कुलूप होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी घरी परतल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप कोयंडा तुटल्याचे दिसताच त्यांना घरात चोरी झाल्याचा संशय आला. त्यानंतर घरात जाऊन पाहिले तर घरातील साहित्य चोरट्याने अस्ताव्यस्त फेकून दिले होते. मात्र कुठलीही वस्तू चोरीला गेली नव्हती जोंधळे यांनी आश्चर्यचकित होऊन घरामध्ये पुन्हा एकदा पाहणी केली. यावेळी त्यांची नजर घराच्या स्वच्छतागृह, स्नानगृह आणि किचनमध्ये लावलेल्या नळाकडे गेली असता, हे नळ चोरट्यांनी लंपास केल्याचे त्याच्या लक्षात आले. नळ चोरल्याने पोलीसांनीही आश्चर्य व्यक्त केले. किशोर यांच्या म्हणण्यानुसार या नळाची किंमत 31 हजाराची असून, याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करत चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. (Thieves stole 16 taps after breaking into a house in Dombivali)

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.