डोक्यात हेल्मेट आणि अंगावर कोट घालून घरफोड्या, दोन सराईत चोरटे अटक

डोंबिवली मानपाडा पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यास यश आले आहे. अटक आरोपींविरोधात विविध पोलीस ठाण्यात 12 गुन्हे दाखल करण्यात आहेत.

डोक्यात हेल्मेट आणि अंगावर कोट घालून घरफोड्या, दोन सराईत चोरटे अटक
मानपाडा पोलिसांकडून अट्टल चोर अटकेतImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 3:16 PM

डोंबिवली / सुनील जाधव : मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात 25 घरफोडीचे गुन्हे दाखल असलेल्या दोन सराईत चोरट्यांना पकडण्यास मानपाडा पोलिसांना यश आले आहे. हे दोन्ही चोरटे मुंब्रा परिसरात राहणारे असून विशेषतः मेडिकलला टार्गेट करत कटावणीच्या मदतीने शटर तोडून रोख रक्कमेसह नशा करण्यासाठी कोरेक्स सिरपची चोरी करायचे. अशाच प्रकारे रात्री मानपाडा परिसरात चोरी करून मोटार सायकलवरून पळ काढत असताना गस्त घालत असलेल्या पोलिसांची गाडी दिसल्याने मोटारसायकल सोडून अंधाराचा फायदा घेत पळण्याच्या तयारीत होते. या चोरट्यांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले.

पोलिसांनी आरोपींची विचारपूस केली असता, या आरोपीने घरफोडी केल्याची कबुली देत 21 लाख 94 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला. सारुद्दिन ताजुद्दीन शेख आणि मोहम्मद जिलानी ईसा शहा अशी या दोन आरोपींची नावे आहेत.

आरोपींविरोधात विविध पोलीस ठाण्यात 12 गुन्हे दाखल

पोलिसांच्या माहितीनुसार या आरोपींवर डोंबिवली पोलीस ठाणे, विष्णु नगर पोलीस ठाणे तसेच ठाणे येथील नौपाडा पोलीस ठाणे या पोलीस ठाण्यात 12 गुन्हे दाखल आहेत. तर मुंबई येथील पायदुनी, सायन, ताडदेव, व्ही.पी. रोड, नागपाडा, आगरीपाडा या पोलीस ठाण्यात सुमारे 25 घरफोडी गुन्हे अशा प्रकारे एकूण 36 चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

हे सुद्धा वाचा

पोलिसांकडून अधिक तपास सुरु

सध्या पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. कल्याण झोन 3 चे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, पोलीस सहाय्यक आयुक्त सुनील कुराडे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे याची टीम अधिक तपास करत आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.