अंधाराचा फायदा घेत चोरी करायला आले, पण गावकरी सतर्क झाले अन्…

| Updated on: Apr 14, 2023 | 1:52 PM

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरटे गावात आले. चोरी करणारच होते तितक्यात गावकरी जागे झाले. मग चोरट्यांसोबत पुढे जे घडले त्याची चोरट्यांनी कल्पनाही केली नसेल.

अंधाराचा फायदा घेत चोरी करायला आले, पण गावकरी सतर्क झाले अन्...
चोरी करायला आलेल्या चोरट्यांना गावकऱ्यांकडून चोप
Image Credit source: TV9
Follow us on

सोलापूर / सागर सूरवसे : रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चार चोरटे हातात शस्त्र घेऊन चोरी करण्यासाठी आले. मात्र सतर्क गावकऱ्यांना जाग आली आणि चोरट्यांचा हा प्रयत्न फसला. मोबाईल टॉवरच्या केबलची चोरी करण्यासाठी हे चोरटे आले होते. मात्र गावकऱ्यांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडत दोन चोरट्यांना चोप देऊन पाठवले. मोहोळ तालुक्यातील नरखेड येथे ही घटना घडली. या मारहाणीत चोरटे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर यावेळी दोन चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. या मारहाण प्रकरणी चार अज्ञात गावकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरी करण्यासाठी आले अन् मार खाऊन गेले

मोहोळ तालुक्यातील नरखेड येथे चार चोरटे मोबाईल केबलची चोरी करण्यासाठी आले होते. मात्र इतक्यात गावकऱ्यांना जाग आली आणि गावकऱ्यांनी दोन चोरट्यांना पकडले. तर दोन चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. चोरीसाठी गेलेल्या चोरट्यांना गावकऱ्यांनी लाकडी बांबूने मारहाण केली.

चोरट्यांकडून गावकऱ्यांवर हल्ला

यावेळी चोरट्यांनीही धारदार शस्त्राने गावकऱ्यांवर हल्ला केला. यात गावकरीही जखमी झाले. याप्रकरणी जखमी चोरटा रोहन धोत्रे याने मोहोळ पोलीस ठाण्यात अज्ञात गावकऱ्यांविरुद्ध फिर्याद दिली. चोरट्यास मारहाण प्रकरणी अनोळखी चार ग्रामस्थांविरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा