चोरटा असल्याचं समजून ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली, नंतर समजलं…

ग्रामस्थांना संशय होता. या संशयावरून गावातील जमावाने तिघांना बेदम मारहाण केली. या मारहाणीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी ताडकलस पोलिसांना चोर पकडल्याची माहिती दिली होती.

चोरटा असल्याचं समजून ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली, नंतर समजलं...
parbhaniImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 1:11 PM

उखळद : चोरीच्या संशयावरून तिघांना ग्रामस्थांकडून बेदम मारहाण करण्यात आली, विशेष म्हणजे मारहाणीत एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना परभणीच्या उखळद येथे घडली आहे. शनिवारी रात्री तीन ते चारच्या दरम्यान उखळद गावात तिघेजण आले होते. ग्रामस्थांना संशय असल्यामुळे त्यांना पकडून जमावाने बेदम मारहाणं केली. मारहाणीचा व्हिडीओ (video viral on social media) सुध्दा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिथल्या काही ग्रामस्थांनी चोरट्यांना पकडल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी माहिती मिळताचं घटनास्थळी जाऊन तिघांना ताब्यात घेतलं. अचानक एकाला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला जवळच्या रुग्णालयात (hospital) दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी (parbhani police) सांगितले आहे.

नेमकं काय झालं

ग्रामस्थांना संशय होता. या संशयावरून गावातील जमावाने तिघांना बेदम मारहाण केली. या मारहाणीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी ताडकलस पोलिसांना चोर पकडल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठत तिघांना ताब्यात घेतले. तिघांपैकी एकाला अस्वस्थ वाटत असल्याने पोलिसांनी त्याला रुग्णालयात भरती केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. किरपानसिंग सुजितसिंग भौड असे मयत व्यक्तीचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतले

मयत व्यक्ती परभणीच्या साखला प्लॉट भागात मामाकडे राहत होता. दरम्यान, जखमींकडून मिळालेल्या माहिती वरून पोलिसांनी ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 8 आरोपींविरोधात ताडकलस पोलीस ठाण्यात 302 सह विविध कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. घडलेल्या घटनेनंतर मात्र जिल्हाभरात खळबळ माजली आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.