भाजप आमदार माधुरी मिसाळ यांना धमकीचा मेसेज; 5 लाख गुगल पे करायला सांगितले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेख याने माधुरी मिसाळ यांनी जनसंपर्कासाठी दिलेल्या मोबाईलवर मेसेज केला आहे. या नंबर वरून त्याने गुगल पे द्वारे दोन ते पाच लाख रुपयांची खंडणी मागीतली आहे.

भाजप आमदार माधुरी मिसाळ यांना धमकीचा मेसेज; 5 लाख गुगल पे करायला सांगितले
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 25, 2022 | 4:56 PM

पुणे : पुण्यातील भारतीय जनता पार्टीच्या आमदार माधुरी मिसाळ( BJP MLA Madhuri Misal) यांना धमकीचा मेसेज आला आहे. खंडणी उकळण्यासाठी त्यांना हा मेसेज पाठवण्यात आला आहे. पैसे न दिल्यास दीर दीपक मिसाळ यांना जीवे मारण्यात येईल अशी धमकी त्यांना या मेसेज द्वारे देण्यात आली आहे.

माधुरी मिसाळ आणि त्यांचे दीर दीपक मिसाळ या दोघांच्या मोबाईलवर हा धमकीचा मेसेज आला आहे. या मसेजमुळे एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. इमरान समीर शेख (रा. 79, विकास नगर, घोरपडी गाव) नावाच्या व्यक्तीविरोधात आयपीसी 386, आयटी ॲक्ट कलम 66 (सी) यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेख याने माधुरी मिसाळ यांनी जनसंपर्कासाठी दिलेल्या मोबाईलवर मेसेज केला आहे. या नंबर वरून त्याने गुगल पे द्वारे दोन ते पाच लाख रुपयांची खंडणी मागीतली आहे.

पैसे न दिल्यास शेख याने मिसाळ यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. आरोपी दररोज मेसेज करून त्रास देत होता. अखेरीस माधुरी यांनी थेट पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे.

शेख हा सराईत गुन्हेगार आहे. त्या विरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात अशाप्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.