Nandurbar accident | नंदुरबारमध्ये तीन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू, एकाच कुटुंबातील दोन भावंड गेली
नंदुरबार : धडगाव तालुक्यातील कुंडलचा मालपाडा मध्ये नदी ओलांडताना तीन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाला. खोल खड्यात बुडून झाला तिघांचा मृत्यू झाला.
नंदुरबार : धडगाव (Dhadgaon) तालुक्यातील कुंडलचा मालपाडामध्ये नदी ओलांडताना तीन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाला. खोल खड्यात बुडून झाला तिघांचा मृत्यू झाला. धडगाव तालुक्यातील ही मुलं आहे. एका पाड्यावरून दुसऱ्या पाड्यावर जातात. त्यासाठी गेले होते. काल दुपारची घटना आहे. देवानंद नदी (river) ओलांडून दुसऱ्या पाड्यावर किराणा दुकानात (shop) जात होते. त्यावेळी त्यांनी ही घटना बघितली. निलेश दीलवर पाडवी (वय 4 वर्षे), मेहेर दिलवर पाडवी (वय 5 वर्ष) आणि पार्वती अशोक पाडवी (वय 5 वर्ष) अशी मृतकांची नावे आहेत. निलेश व मेहेर हे दोघेही भाऊ आहेत.
घटना कशी घडली
किराणा सामान आणण्यासाठी मुलांना दुसऱ्या पाड्यावर जायचं होतं. त्यासाठी त्यांना नदी ओलांडायची होती. नदीत कमी पाणी आहे असं नेहमीप्रमाण समजून मुलं पुढं जात होती. कुंडलचा मालपाडा येथे ही घटना घडली. मुलांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. एका काठावरून पाय घसरून पडला. दुसरा त्याला वाचविण्यासाठी गेला. तिसराही तसाच गेला. ही घटना दूरून एकाला दिसली. तो धावत गेला. तोपर्यंत तिन्ही मुलं बुडाली होती. त्यानं ही माहिती गावकऱ्यांनी तसेच पोलिसांना दिली. गावकऱ्यांनी मुलांचे मृतदेह शोधाशोध केली. पोलीस व गावकऱ्यांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढण्यात आले. शवविच्छेदानासाठी धडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
तिन्ही मुलं पाडवी कुटुंबातील
नीलेश व मेहेर हे दीलवर पाडवी यांची मुलं आहेत. तर तिसरी पार्वती अशोक पाडवी यांची मुलगी आहे. तिघेही भावंड घरच्यांना मदत करावी म्हणून कामानिमित्त जात होते. पाड्यावरूल मुलं बरेचदा बकऱ्या चारण्यासाठी एका पाड्यावरून दुसऱ्या पाड्यावर होतात. नंदुरबारमध्ये विखुरलेली वस्ती आहे. छोटीछोटी पाडी आहेत. एका पाड्यावरून दुसऱ्या पाड्यावरून जावं लागते. ही मुलं किराणा दुकानात सामान खरेदी करण्यासाठी गेली होती. पाडवी या एकाच कुटुंबातील ही मुलं आहेत. त्यापैकी दोन भावंड आहेत. त्यामुळं पाडवी कुटुंबावर दुःखाचं संकट कोसळलं आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी पाऊस आला. नदी, नाल्यांना पूर आला. त्यामुळं खड्ड्यांमध्ये पाणी साचलं.