नाशिकमध्ये लाचखोर अधिकाऱ्यांचा सुळसुळाट, एकाच दिवशी तीन सपाळे यशस्वी
नाशिक : नाशिकच्या अधिकाऱ्यांना नेमकं झालं तरी काय असा प्रश्न आता सर्वसामान्य नाशिककरांना पडू लागला आहे. एकाच दिवसात तीन ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे सापळे यशस्वी झाले आहेत. एकूणच या घटणेने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकूणच नाशिकमध्ये लाचखोरीच्या घटनांनी डोकं वर काढलं आहे. नाशिकच्या पाथर्डी परिसरातील मंडल अधिकारी, सिन्नर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्राचार्य आणि […]
नाशिक : नाशिकच्या अधिकाऱ्यांना नेमकं झालं तरी काय असा प्रश्न आता सर्वसामान्य नाशिककरांना पडू लागला आहे. एकाच दिवसात तीन ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे सापळे यशस्वी झाले आहेत. एकूणच या घटणेने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकूणच नाशिकमध्ये लाचखोरीच्या घटनांनी डोकं वर काढलं आहे. नाशिकच्या पाथर्डी परिसरातील मंडल अधिकारी, सिन्नर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्राचार्य आणि सूरगाण्यातील उमेदचा अधिकारी असे तिघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले आहे. अशा घटना वारंवार घडत असल्याने लाचखोर अधिकाऱ्यांच्या यादीत नाशिक जिल्हा नेहमी अग्रस्थानी असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान काही दिवसांपासून लाच प्रकरणाच्या उघडकीस येत असल्याने नागरिक सजग झाल्याची चर्चा होऊ लागली आहे.
नाशिक जिल्ह्यातील पहिली कारवाई ही पाथर्डी परिसरातील मंडल अधिकाऱ्यासह खासगी एजंटला 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे.
तर दुसरी कारवाई ही नाशिकच्या सिन्नर येथील शासकीय आयटीआय म्हणजेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यास तीस हजार रुपयांची लाच स्वीकारतांना अटक केली आहे.
याशिवाय तिसरा सापळा हा सुरगाणा येथे यशस्वी झाला आहे. उमेदच्या एका प्रभाग समन्वयकास 12 हजाराची लाच स्वीकारतांना अटक करण्यात आली आहे.
पहिल्या कारवाईत पन्नास हजार घेतांना पुरुषोत्तम दत्तात्रय पराडकर आणि खाजगी महिला एजंट केतकी किरण चाटोरकर यांना अटक केली आहे.
दुसऱ्या घटनेत प्राचार्य निलेश बबन ठाकूर यांना लाच घेतांना अटक केली असून त्यांच्याविरोधात एका कंत्राटदाराने तक्रार केली होती.
तिसऱ्या घटणेमध्ये सुरगाण्यातील मानधन मिळवून देण्याच्या नावाखाली 12 हजारांची लाच घेणाऱ्या विलास खटके याला एसीबीने अटक केली आहे.
लाचलुचपत विभागाने एकाच दिवशी केलेल्या कारवाईत तीन अधिकारी लाच घेतांना सापळ्यात अडकल्याने कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.