VIDEO : भरधाव कारने तीन मुलांना चिरडले, एकाची प्रकृती गंभीर; घटना सीसीटीव्हीत कैद

दिल्लीच्या गुलाबी बाग परिसरात एका भरधाव कारने फुटपाथवरून चालणाऱ्या मुलांना चिरडले. हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे.

VIDEO : भरधाव कारने तीन मुलांना चिरडले, एकाची प्रकृती गंभीर; घटना सीसीटीव्हीत कैद
भरधाव कारने तीन मुलांना चिरडलेImage Credit source: social
Follow us
| Updated on: Dec 18, 2022 | 7:46 PM

दिल्ली : बेदरकार ड्रायव्हिंगमुळे जीवघेण्या अपघातांचे सत्र वाढले आहे. राजधानी दिल्लीमध्येही अशा अपघातांची कमी नाही. दिल्लीच्या गुलाबी बाग परिसरात एका भरधाव कारने फुटपाथवरून चालणाऱ्या मुलांना चिरडले. हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. भरधाव वेगातील कारखाली तीन निष्पाप मुले चिरडली. या अपघाताने बेदरकार ड्रायव्हिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तिन्ही मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

मुलांना वाचवण्यासाठी नागरिकांची धावाधाव

भरधाव गाडीखाली चिरडलेल्या मुलांना वाचवण्यासाठी रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या तसेच परिसरातील नागरिकांनी प्रचंड धावाधाव केली. मुलांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले. यातील दोन मुलांना किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली. मात्र एकाची प्रकृती अद्याप गंभीर आहे.

तातडीच्या उपचारामुळे तिने मुलांच्या जीवावरील धोका टळला. सध्या गंभीर अवस्थेत असलेल्या मुलाच्या प्रकृतीतही अधिक उपचारांती सुधारणा होईल, असा विश्वास रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, अपघात झालेल्या परिसरात शाळकरी मुलांची सतत वर्दळ सुरू असते. त्यामुळे या मार्गावरील गाड्यांना वेगाची मर्यादा आखून देण्यात यावी, अशी मागणी सध्या जोर धरत आहे. दरम्यान, अपघाताला कारणीभूत ठरलेल्या चालकाला अटक करण्यात आली असून अधिक पोलीस तपास सुरू आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.