कॉलेजच्या होस्टेलमध्ये अंघोळ करणाऱ्या मुलींचं, मुलींच्याच दुसऱ्या ग्रुपकडून व्हीडिओ चित्रण, मुलांना व्हीडिओ शेअर

| Updated on: Jul 26, 2023 | 10:20 PM

या प्रकरणात बाथरुममध्ये कॅमेरे लपवून मुलींचे अंघोळीचे व्हिडीओ चित्रीकरण करणाऱ्या तीन मुलींच्या विरोधात आणि महाविद्यालय प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

कॉलेजच्या होस्टेलमध्ये अंघोळ करणाऱ्या मुलींचं, मुलींच्याच दुसऱ्या ग्रुपकडून व्हीडिओ चित्रण, मुलांना व्हीडिओ शेअर
cctv
Image Credit source: socialmedia
Follow us on

कर्नाटक | 26 जुलै 2023 : कर्नाटक राज्यातील उडुपी शहरात एका नर्सिंग कॉलेजातील विद्यार्थींनी आपल्याच मैत्रिणींचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ बाथरुममध्ये छुपा कॅमेरा लावून चित्रित केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या विद्यार्थींनी हा व्हिडीओ त्यांच्या मित्रांना शेअर केला. त्यानंतर त्यांनी हे व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी तीन विद्यार्थींनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उडुपी शहरातील अंबालपाडी येथील नेत्र ज्योती महाविद्यालयात बुधवारी तीन विद्यार्थींनी आपल्याच मैत्रीणींचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ कॅमेरे लावून चित्रित केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणातील तीन विद्यार्थींनी हे आपल्याच सहकारी मैत्रीणींचे व्हिडीओ त्यांच्या मित्रांना शेअर केले. त्या मित्रांनी हे व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल केल्यानंतर खळबळ उडाली आहे. टॉयलेटमध्ये विद्यार्थींनीनी कॅमेरा लपवून ठेवला होता. त्यानंतर हे व्हिडीओ विद्यार्थीनींनी आपल्या मित्रांना दिले. त्यांनी हे व्हिडीओ त्यानंतर समाजमाध्यमात पसरवल्याचा आरोप होत आहे.  पोलिसांनी या प्रकरणात भादंवि कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

विद्यार्थींनीच्या दोन गटात भांडण

या प्रकरणात बाथरुममध्ये कॅमेरे लपवून मुलींचे अंघोळीचे व्हिडीओ चित्रीकरण करणाऱ्या तीन मुलींच्या विरोधात आणि महाविद्यालय प्रशासनाच्या विरोधात आयपीसी कलम 509, 204, 175, 34 आणि आयटी कायदा कलम 66 ( ई ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर महाविद्यालयातील व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या मुली आणि पीडीत मुलींमध्ये जोरदार भांडण झाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.