बाईकचा बाईकला धक्का लागला, मग भररस्त्यात जे घडलं त्याने पालघर हादरलं !

मित्रासोबत बाईकवरुन तरुण चालला होता. रस्त्यात दुसऱ्या बाईकला धक्का लागला. मग जे घडलं त्यानंतर पुन्हा कधीच घरी परतू शकला नाही.

बाईकचा बाईकला धक्का लागला, मग भररस्त्यात जे घडलं त्याने पालघर हादरलं !
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 1:23 PM

नालासोपारा : क्षुल्लक वादातून भररसत्यात 20 वर्षीय तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे घडली. बाईकला धक्का लागला म्हणून दोघांनी मिळून 20 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नालासोपारा पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. रविवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रोहित यादव असे मयत तरुणाचे नाव आहे. तरुण मुलाच्या मृत्यूमुळे यादव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बाईकचा धक्का लागला म्हणून मारहाण

रोहित यादव हा रविवारी सायंकाळी आपल्या मित्रासोबत बाईकवरुन चालला होता. याचदरम्यान दुसऱ्या बाईकवरुन तिघे जण समोरुन येत होते. यावेळी रोहितच्या बाईकचा आरोपींच्या बाईकच्या आरशाला धक्का लागला. यानंतर आरोपींनी रोहितला थांबवले. मग धक्का लागल्याचा जाब विचारत रोहित आणि त्याच्या मित्राला मारहाण करण्यास सुरवात केली. यात रोहितचा मृत्यू झाला.

तिन्ही आरोपींना अटक

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. तसेच तिघा आरोपींविरोधात कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेनुळे नालासोपारा परिसरात खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा

पालघर जिल्ह्यात गुन्हेगारी वाढतच चालली आहे. दररोज काही ना काही गुन्हेगारी घटनांमुळे पालघर जिल्हा चर्चेत असतो. ही गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे. क्षुल्लक कारणातून होणाऱ्या हत्याकांडामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.