दुर्दैवी घटनेची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही, संपूर्ण कुटुंबासह गाव ढसाढसा रडतंय…
सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान काका आणि दोन पुतणे हे आठवडे बाजार करून गावाकडे चालले होते. त्यावेळी वणी पिंपळगाव रस्त्यावर बोराळे फाट्यावर त्यांचा दुचाकी अज्ञात वाहनाने धडक दिली.
नाशिक : नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील तिसगाव येथील कराटे कुटुंबावर शोककळा ( Death News ) पसरली आहे. ही शोककळा एका कुटुंबावर नाही तर संपूर्ण गावावर पसरली असून गाव ढसाढसा रडत आहे. नाशिकच्या वणी – पिंपळगाव ( Nashik News ) रस्त्यावरील बोराळे फाट्यावर एक अपघात झाला आहे. अज्ञात वाहनाने एका दुचाकीला धडक ( Accident ) दिली आहे. त्यामध्ये दुर्दैवी बाब म्हणजे दुचाकी वरील तिघांचाही मृत्यू झाला आहे. त्यात तिघे एकाच कुटुंबातील होते. काका आणि दोन पुतण्यांचा त्यामध्ये समावेश आहे. मृत्यू झालेले तिघेही संपूर्ण गावात कामाच्या निमित्ताने सर्वांच्या परिचयाचे होते. त्यामुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान काका आणि दोन पुतणे हे आठवडे बाजार करून गावाकडे चालले होते. त्यावेळी वणी पिंपळगाव रस्त्यावर बोराळे फाट्यावर त्यांचा दुचाकी अज्ञात वाहनाने धडक दिली.
या धडकेत काका निवृत्ती सखाराम कराटे आणि पुतणे केदु यशवंत कराटे, संतोष विष्णु कराटे यांचा जागीच मृत्यू झाला होता. शेतमजुरी करणारे हे तिघेही आठवडे बाजारासाठी एकाच दुचाकीवरुन चालले होते.
घडलेला अपघात इतका भीषण होता की यामध्ये त्यांना उपचारासाठी घेऊन जाण्याची वेळ देखील शिल्लक राहिली नव्हती. धडक दिलेल्या वाहन चालकाने तिथून वाहनासहित पळ काढला.
रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांनी मदत करण्यासाठी धावपळ सुरू केली होती. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. उपस्थित नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली त्यानंतर रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
रात्रीच्या वेळी त्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर पोलीसांनी नातेवाईकांच्या आणि गावकऱ्यांच्या हाती मृतदेह स्वाधीन केले होते, रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
या तिघांच्या अपघाताचे वृत्त त्यांच्या गावी कळविण्यात आल्याने संपूर्ण गावाला धक्का बसला आहे. तिघांचाही शेतमजुरीच्या निमित्ताने संपूर्ण गावात संपर्क होता. त्यामुळे संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे.
ग्रामीण पोलीसांनी याबाबत अपघाताचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. या अपघाताच्या बाबत पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. वाहने चालवतांना काळजी घ्यावी असेही बोललं जात आहे.
ग्रामीण भागात दुचाकीवर सर्रासपणे तिघे प्रवास करतात, कधी-कधी तर चार-चार जणांचा प्रवासही दिसून येतो. त्यामुळे वाहन चालवतांना देखील अडचणी येतात, अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रवास करतांना सुरक्षित प्रवास करणे गरजेचे आहे.