दुकानात सामान घ्यायला गेला तो परत आलाच नाही, अल्पवयीन मुलांनीच केले मित्राचे अपहरण… कारण ऐकून व्हाल अवाक् !

गेम खेळण्यासाठी आणि मजा मस्ती करण्यासाठी काही अल्पवयीन मुलांनी त्यांच्याच मित्राचं अपहरण केले. पण पैसे मिळाले नाहीत म्हणून त्यांनी...

दुकानात सामान घ्यायला गेला तो परत आलाच नाही, अल्पवयीन मुलांनीच केले मित्राचे अपहरण... कारण ऐकून व्हाल अवाक् !
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 5:54 PM

कलकत्ता | 28 ऑगस्ट 2023 : कॉम्प्युटर गेम खेळण्यासाठी आणि मजा मस्ती करण्यासाठी पैसे मिळवण्याच्या इच्छेने तीन अल्पवयीन मुलांनी त्यांच्याच मित्राचे अपहरण (kidnapped friend) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे त्यांनी खंडणी म्हणून मोठी रक्कम मिळेल, भरपूर पैसे मिळतील अशी त्यांना अपेक्षा होता. मात्र त्यात अपयश आल्यावर त्यांनी स्वत:च्याच मित्राची गळा दाबून हत्या (crime news) केल्याचे धक्कादायक सत्य उघडकीस आले आहे. पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात हा खळबळजनक प्रकार घडला.

मृतदेह नदीत फेकून दिला

एवढेच नव्हे तर त्यांनी मित्राचा मृतदेह एका कापडात बांधून सरळ नदीतच फेकून दिला. पकडले गेल्यावर त्यांनी पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. मृत मुलगा अवघ्या 14 वर्षांचा होता, त्याला वडील नव्हते.

पोलिसांसमोर दिली गुन्ह्याची कबूली

तीन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांनी गुन्हा कबूल केला आहे. आपल्याला कॉम्प्युटर विकत घ्यायचा होता, म्हणून एका मित्राचे अपहरण करून त्याच्या आईला फोन करून खंडणी म्हणून तीन लाख रुपये मागितल्याचे आरोपींनी सांगितले. पण त्याची आई पैसे देऊ शकली नाही. म्हणून आरोपींनी मित्राला त्याची शेवटची इच्छा विचारली आणि त्याला कोल्डड्रिंक, रसगुल्लाही खायला दिला. त्यानंतर त्याचा जीव घेतला.

ही घटना जिल्ह्यातील कृष्णनगरच्या घुरनी भागातील आहे. मृत मुलगा हा आठव्या इयत्तेत शिकत होता. शुक्रवारी तो काही सामान विकत घेण्यासाठी दुकानात गेला, पण परत आलाच नाही. शनिवारी सकाळी त्याच्या आईला एक फोन आला व मुलाच्या बदल्यात त्यांच्याकडे तीन लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली.

त्याच्या आईने तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी फोनचा तपास करू मुलांचा शोध घेतला आणि त्यांना अटक केली असता सर्व प्रकार उघड झाला. पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.