Shrinagar Terrorist : उरीमध्ये घुसखोरीचा कट उधळला; पाकिस्तानच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

सीमेपलीकडून होत असलेल्या या घुसखोरीची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली. या गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दलांच्या जवानांनी तातडीने संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू केली. याचदरम्यान तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.

Shrinagar Terrorist : उरीमध्ये घुसखोरीचा कट उधळला; पाकिस्तानच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंगचे सत्रImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 6:47 PM

श्रीनगर : बारामुल्ला जिल्ह्यातील उरी भागात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलां (Security Force)नी आज उधळून लावला. यावेळी सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान (Terrorist Killed) घातले आहे. दहशतवाद्यांच्या एका गटाने कमलकोट येथून भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. सीमेपलीकडून होत असलेल्या या घुसखोरीची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली. या गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दलांच्या जवानांनी तातडीने संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू केली. याचदरम्यान तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले असून, चौथा दहशतवादी फरार (Absconding) झाला आहे. त्याचा सुरक्षा दलांच्या विविध पथकांमार्फत शोध घेतला जात आहे. दहशतवाद्यांकडील मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.

याआधी सोमवारी रात्री राजौरीतील नियंत्रण रेषेवर (एलओसी) नौशेरा सेक्टरमध्ये दोन घुसखोर दहशतवाद्यांना लष्कराने ठार केले होते. त्या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. याबाबत लष्करातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले की सोमवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांच्या एका गटाने नौशेरातील लाम भागातील पुखरानी गावात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान एका दहशतवाद्याचा पाय भूसुरुंगावर पडल्याने स्फोट झाला. दहशतवाद्यांच्या या हालचालीवर सैनिक सतत लक्ष ठेवून होते. दहशतवाद्यांना दुरून इशारा देण्यात आला. मात्र ते पळू लागले. यादरम्यान दोन दहशतवादी मारले गेले.

फिदायन दहशतवादी तबराक नुकताच लष्कराच्या ताब्यात

लश्कर-ए-तोयबाचा प्रशिक्षित गाईड आणि फिदायन दहशतवादी तबराक याला नौशेरा सेक्टरमधील सेर मकडी भागातून लष्कराने रविवारी पकडले. तबरकवर सध्या राजोरी येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाकिस्तानी लष्कराच्या इंटेलिजन्स युनिटसाठी काम करणारा 32 वर्षीय तबराक हुसेन गेल्या सहा वर्षांत दुसर्‍यांदा घुसखोरी करताना पकडला गेला आहे. यावेळी त्याचे रूप फिदाईन दहशतवाद्यासारखे आढळले आहे. पीर पंजाल पर्वतरांगेला लागून असलेल्या राजोरी आणि पूंछ जिल्ह्यात अलीकडच्या काळात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. दहशतवाद्यांच्या स्लीपर सेल नेटवर्कपासून दहशतवादी मॉड्युलपर्यंत दहशतवादी फंडिंग दोन्ही जिल्ह्यांशी जोडले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर लष्करासह सर्वच सुरक्षा यंत्रणा हाय अ‍ॅलर्ट मोडवर आहेत. अलीकडेच राजोरी येथील लश्कर कमांडर तालिब हुसेन याला अटक केल्यानंतर ड्रोनमधून ड्रग्स, शस्त्रे आणि हवाला पैशांचे नेटवर्क चालविणारे तीन दहशतवादी मॉड्युल पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. कठुआ, सांबा, जम्मू जिल्ह्यांपासून ते राजोरीपर्यंत हे नेटवर्क कार्यरत होते, असे अधिक तपासात उघड झाले आहे. (Three Pakistani terrorists were killed by security forces in Uri Srinagar)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.