GST Fraud : जीएसटी चुकवल्याप्रकरणी ठाण्यातील कंपनीच्या तीन पार्टनर्सना अटक, एकूण 78 कोटींच्या अफरातफरीचा आरोप

ही कारवाई म्हणजे सीजीएसटी मुंबई क्षेत्राने कर चुकवेगिरी आणि बनावट आयटीसी जाळ्याविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग आहे. आतापर्यंत सीजीएसटी भिवंडी आयुक्तालयाने गेल्या वर्षभरात 14 जणांना अटक केली आहे.

GST Fraud : जीएसटी चुकवल्याप्रकरणी ठाण्यातील कंपनीच्या तीन पार्टनर्सना अटक, एकूण 78 कोटींच्या अफरातफरीचा आरोप
जीएसटी चुकवल्याप्रकरणी ठाण्यातील एका कंपनीच्या तीन पार्टनर्सना अटकImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 9:21 PM

ठाणे : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) चुकवल्याप्रकरणी आणि एकूण 78 कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी ठाणे जिल्ह्यातील एका फर्मच्या तीन पार्टनर्सना रविवारी अटक (Arrest) केले आहे. मुंबई क्षेत्रातील सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा कराच्या भिवंडी आयुक्तालयाने गुप्त माहितीच्या आधारे मे. एएस अॅग्री अँड अॅक्वा एलएलपी विरुद्ध ही कारवाई केली. या फर्मची स्थापना केलेल्या तीन भागीदारांना सीजीएसटी कायदा (GST Law), 2017 च्या कलम 132 चे उल्लंघन केल्याबद्दल रविवारी तपासादरम्यान गोळा केलेल्या सबळ पुराव्यांच्या आधारे सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 69 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. तिघांनाही 12 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

सीजीएसटी भिवंडी आयुक्तालयाकडून गेल्या वर्षभरात 14 जणांना अटक

या फर्मने पॉली हाऊसच्या बांधकामासाठी कार्य अनुबंध सेवेच्या प्राप्तकर्त्यांकडून प्राप्त 292 कोटी रुपयांच्या आगाऊ देय रकमेवर, 53 कोटी रुपयांचा जीएसटी भरलेला नाही. जो सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 13(2)(b) अंतर्गत करपात्र आहे. याशिवाय, या फर्मने सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 17(5)(c) च्या तरतुदींनुसार उपलब्ध नसलेल्या स्थावर मालमत्तेच्या बांधकामासाठी कार्य अनुबंध सेवेवर फसवणूक करून 25 कोटी रुपयांच्या आयटीसीचा लाभ घेतला आहे. ही कारवाई म्हणजे सीजीएसटी मुंबई क्षेत्राने कर चुकवेगिरी आणि बनावट आयटीसी जाळ्याविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग आहे. आतापर्यंत सीजीएसटी भिवंडी आयुक्तालयाने गेल्या वर्षभरात 14 जणांना अटक केली आहे. सीजीएसटी अधिकारी संभाव्य फसवणूक करणार्‍यांना ओळखण्यासाठी आणि त्यांचा शोध घेण्यासाठी डेटा विश्लेषण आणि नेटवर्क विश्लेषण साधने वापरत आहेत. करचोरी करणाऱ्यांविरुद्धची ही मोहीम सीजीएसटी अधिकारी येत्या काही दिवसात अधिक तीव्र करणार आहेत. (Three partners of a company in Thane arrested for evasion of GST)

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.