‘निकाल तुमच्या बाजूने येईल 3 लाख द्या’, लाच घेणाऱ्या खासगी एजंटला कोल्हापुरात बेड्या

शेतजमिनीच्या वादाचा निकाल आपल्या बाजूने देतो, असे सांगून 3 लाख रुपयांची लाच घेणाऱ्या भिकाजी नामदेव कुराडे, सारंग कुराडे, इम्रान शेख अशा तीन एजंट्सना इचलकरंजी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने दुपारी रंगेहाथ पकडले. ही कारवाई इचलकरंजी येथील मध्यवर्ती बसस्थानकासमोरील एका हॉटेलाजवळ करण्यात आली.

'निकाल तुमच्या बाजूने येईल 3 लाख द्या', लाच घेणाऱ्या खासगी एजंटला कोल्हापुरात बेड्या
ICHALKARANJI CORRUPTION
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 5:11 PM

कोल्हापूर : शेतजमिनीच्या वादाचा निकाल आपल्या बाजूने देतो, असे सांगून 3 लाख रुपयांची लाच घेणाऱ्या भिकाजी नामदेव कुराडे, सारंग कुराडे, इम्रान शेख अशा तीन एजंट्सना इचलकरंजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दुपारी रंगेहाथ पकडले. ही कारवाई इचलकरंजी येथील मध्यवर्ती बसस्थानकासमोरील एका हॉटेलाजवळ करण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या पथकाने ही कारवाई केली. (Three private agents arrested taking 3 lakh rupees bribe in Kolhapur Ichalkaranji)

शेतजमिनीच्या मालकीचा वाद

मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांची शिरोळ तालुक्यात शेतजमीन आहे. या शेतजमिनीच्या मालकीचा वाद सध्या सुरू आहे. सुरवातीला प्रांत कार्यालयात तक्रारदार यांच्या विरोधात निकाल गेला होता. त्यानंतर तक्रारदार यांनी अप्पर जिल्ह्याधीकारी यांच्याकडे अपील दाखल केले. त्यावर सुनावणी सुरू आहे.

3 लाख रुपये घेताना अटक  

दरम्यान, तक्रादार यांच्याशी कुराडे यांनी संपर्क साधला. निकाल आपल्या बाजूने लावून देण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी केली. त्यातील 2 लाख रुपये कुराडे यांनी आधीच घेतले होते. उर्वरित 3 लाखाची रक्कम घेत असताना कुराडे हे लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात सापडले. या प्रकरणात सागर कुराडे, इमरान शेख, भिकाजी कुराडे यांचा समावेश आहे. हे पैसे कुणासाठी मागितले होते ? यामध्ये शासकीय अधिकारी आहे का ? याचा तपास पोलीस करत आहेत .

जानेवारी महिन्यामध्ये आरोपींनी तक्रारदाराकडे पैसे मागितले होते. त्यावेळी थोडी रक्कम घेऊन उर्वरित रक्कम पुन्हा मागण्यासाठी कुराडे हा इचलकरंजी शहरामध्ये आला होता. यावेळी त्याला रंगेहात पोलिसांनी पकडले.

आरोपीचा जमीन खरेदी-विक्रीचा मोठा व्यवसाय 

अटक केलेल्या आरोपींचा जमीन खरेदी-विक्रीचा मोठा व्यवसाय आहे. त्याची ओळख शासकीय कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींचा जिल्हाधिकाऱ्यांशी काही संबंध आहे का ? या सर्व बाबींचा तपास अँटी करप्शन ब्युरो करत आहे.

इतर बातम्या :

सावत्र बापाने पंचगंगेत बुडवलेल्या मुलीला शोधताना सापडला 50 वर्षीय बेपत्ता महिलेचा मृतदेह

नऊ वर्षीय मुलीला पंचगंगेत बुडवून ढकललं, 14 तासांनी मृतदेह सापडला, सावत्र बापाच्या कृत्याने कोल्हापूर हादरलं

वैयक्तिक वादातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, औरंगाबादेत रस्त्यावर गाड्यांची तोडफोड

(Three private agents arrested taking 3 lakh rupees bribe in Kolhapur Ichalkaranji)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.